Anis Sundke, Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar News : धंगेकरांनी लाटली वक्फ बोर्डाची मालमत्ता; ‘एमआयएम’चा गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी थेट धंगेकरांवर आरोप करत त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून 13 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. त्यामुळे अवघे काही दिवस प्रचारासाठी राहिले असताना उमेदवारांकडून आरोपांची राळ उठवली जात आहे. यातच आता ‘एमआयएम’चे उमेदवार अनिस सुंडके यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar News) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

‘एमआयएम’चे (AIMIM) उमेदवार अनिस सुंडके यांनी पुण्यामध्ये टिपू सुलतान यांचं स्मारक उभारण्याची घोषणा केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. भाजपाकडून (BJP) याला जोरदार विरोध करण्यात आला आहे. यानंतर सुंडके (Anis Sundke) यांच्याकडून आणखी एक आरोप करण्यात आला आहे. अनिस सुंडके यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. (Lok Sabha Election 2024)

अनिस सुंडके म्हणाले, मुस्लिम वक्फ बोर्डाची मालमता काँग्रेसचे पुणे लोकसभा उमेदवार आणि आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना हताशी धरून संगनमताने बळकावली आहे. धंगेकरांनी हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतला असून आता खासगी विकसक उत्कर्ष असोसिएट्‌सच्या मदतीने त्या ठिकाणी निवासी- व्यावसायिक इमारत बांधली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रविवार पेठेत लक्ष्मी रस्त्याजवळ सर्व्हे नंबर 966 हा तब्बल 1 हजार 607 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारा भूखंड वक्फ बोर्डाची मालमता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो भाडेकराराने देण्यात आला. सन 1947 नंतर कायद्‌याचा भंग करून वक्फ बोर्डाची ही मालमत्ता बँकेकडे गहाण टाकण्यात आली. बँकेने परस्पर त्याचा लिलाव केला. त्यानंतर गेल्यावर्षीच्या (2023) मार्च-एप्रिल महिन्यात हा मोक्याचा भूखंड उत्कर्ष असोसिएशनतर्फे भागीदार वृषाली रावसाहेब शेंडगे, प्रतिभा रविंद्र धंगेकर, प्रतिक सुनिल अहीर यांच्या नावे करण्यात आल्याचं सुंडके यांनी सांगितलं.

लक्ष्मी रस्त्यावर मोक्याच्या जागी असणाऱ्या या मालमत्तेची बाजारभावाने आजची किंमत करोडो रुपयांच्या घरात आहे. या व्यवहारामुळे मुस्लिम समाजाच्या श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत. वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणजे सर्वशक्तीमान अल्लाची देन असते. गरीब, मागास, मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी ही मालमत्ता वापरायची असते. मात्र पुण्यासारख्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांनीच वक्फ बोर्डाचा अमूल्य भूखंड बड्या महापालिका अधिकाऱ्याशी संगनमत करून बळकावला आहे, असा आरोप सुंडके यांनी केला आहे.

संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे. त्यामुळे शासनाने या व्यवहाराची काटेकोर चौकशी करून वक्फ बोर्डाची मालमता परत करायला हवी, अशी मागणी देखील सुंडके यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी काँग्रेसने अनिस सुंडके हे भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता अनिस सुंडके यांनी हे आरोप केले आहे. त्यामुळे या आरोपांमध्ये नेमकी कोणती राजकीय खेळी आहे, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT