Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekarsarkarnama

Ravindra Dhangekar News : रवींद्र धंगेकरांचा मास्टर प्लॅन, पुण्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा...

Pune Loksabha : शहराला भेडसवणाऱ्या वाहतूक, पर्यावरण, नदी सुधार या मुद्यांवर भर देताना हे प्रश्न सोडण्याचे आश्नासन रवींद्र धंगेकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले आहेत.

Loksabha Election : लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय मुद्यांवर लढली जाते. त्यासाठी राजकीय पक्ष आपले जाहीरनामे प्रसिद्ध करतात. मतदारसंघाची विस्तार पाहता उमेदवार देखील स्थानिक मुद्द्यांना फारसे महत्त्व न देता राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक लढत असतात. मात्र, राष्ट्रीय मुद्यां इतकेच स्थानिक प्रश्न देखील महत्त्वाचे असतात हेच ओळखून पुणे मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे.पुणे शहराला भेडसवणाऱ्या वाहतूक, पर्यावरण, नदी सुधार या मुद्यांवर भर देताना हे प्रश्न सोडण्याचे आश्नासन रवींद्र धंगेकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले आहेत.

Ravindra Dhangekar
Eknath Shinde : 'काँग्रेसका हात पाकिस्तान के साथ', वड्डेटीवारांना मुख्यमंत्री शिंदेंनी फटकारले

पुणे मतदारसंघात काँग्रेस, भाजप BJP, वंचित यांच्यामध्ये लढत होत आहे. भाजपचे उमेदवार मुरलधीर मोहोळ यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. तर, काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधींची सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी Rahul Gandhi या दोघांनीही आपल्या सभेत राष्ट्रीय मुद्यांवरच भर देत आपापल्या उमेदवाराला विजयी करण्याचे आव्हान केले होते.

सार्वजनिक वाहतूक, नागरी सुरक्षा, सौरऊर्जेचा वापर, आरोग्य, शिक्षण, कायदा सुव्यवस्था , सांस्कृतिक पर्यटन, उद्योग आदी मुद्यांचा समावेश रवींद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्यात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोजगार निर्मिती करणार

रवींद्र धंगेकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात, पुण्यनगरीत उभे राहिलेले आयटी क्षेत्र यामुळे पुण्याला जगभर ओळख लाभली. आज मात्र असंख्य स्वप्ने उराशी बाळगून आलेल्या हजारो तरूणांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे हे क्षेत्र नैराश्येच्या गर्तेत सापडले आहे. हीच बाब लक्षात घेत तरी तरुणांना रोजगार निर्मितीसाठी विविध कौशल्य विकास केंद्र सुरू करून रोजगार निर्मिती करणार असल्याचे आश्नासन दिले आहे.

मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प

मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पातून पुणेकरांना काहीच मिळाले नाही.दररोज सुमारे ८ कोटी लिटर पाण्याचे शुध्दीकरण होणे अपेक्षित असताना सध्या मात्र केवळ १ कोटी लिटर पाणी शुध्दीकरण केले जातेय.नदी सुधार प्रकल्प मोठे क्षमतेने राबवत, मुळा-मुठेच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून धंगेकरांनी दिले आहे.

वाहतूक कोंडी सोडवणार

वाहतूक कोंडी ही पुण्यातील सगळ्यात मोठी समस्या. पुणेकर सातत्याने या विषयावरती आपला संताप व्यक्त करताना दिसतात. गेल्या १० वर्षात पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणेकरांना केवळ फसवी आश्वासने देण्यात आली.पुण्याची वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपुल, अंडरपासची कामे पूर्ण करून सर्व मुख्य चौकातील वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करणार, असे सांगत पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचे आश्वासन रवींद्र धंगेकर यांनी दिले आहे.

Ravindra Dhangekar
Raj Thackeray News : वर्षापूर्वीच कोकण वाचवा म्हणणारे राज यांनी त्याच मुद्द्यावरून उद्धवना विकासविरोधी ठरवले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com