Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांचे मोठं विधान; म्हणाले, 'आपण एकटे पडले आहोत...'

Political News : लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे, असे सांगत देशाची सुरक्षा मी करू शकतो, असे वक्तव्य केले होते. पण आज परिस्थिती वेगळी आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Pune News : लोकसभा निवडणुका तोंड्यावर आला असल्याने प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकमेकांवर केल्या जात असलेल्या टीकेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे, असे सांगत देशाची सुरक्षा मी करू शकतो, असे वक्तव्य केले होते. पण आज परिस्थिती वेगळी आहे. सर्वसामान्य माणसाला याचा काहीच उपयोग झाला नाही. आज चायना आपल्या देशात घुसत आहे. तर राजनाथ सिंह म्हणतात की तिथले लोक भारतात यायला तयार आहेत, हे प्रचंड मोठा खोट बोलत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. (Prakash Ambedkar News)

Prakash Ambedkar
Ashok Chavan On Sugar Factory : एकही संस्था ज्यांना नीट चालवता आली नाही, त्यांनी बोलू नये..

पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. देशाच्या सुरक्षेला मोठा धोका आहे. नेपाळ सुद्धा आता आपल्या देशाला चॅलेंज देत आहे. त्यांच्या नोटावर आपला असणारा भाग त्यांनी त्यांचा भाग म्हणून दाखवला आहे. उत्तरखंडमधील हा सगळा भाग आहे. तिथल्या पंतप्रधानांनी कॅबिनेट घेऊन हा निर्णय घेतला आहे. मालदीव सोबत वैयक्तिक प्रॉब्लेम झाल्याने तिथली आर्थिक मदत बंद केली आहे. मालदीव विरोधात कारवाई केली जात आहे. सरकार यावर काहीच बोलत नाही. मालदीव आपल्या सुरक्षचेच्या दृष्टीने महत्वाचे बेट असल्याचे आंबेडकर म्हणाले.

अफगाणिस्तान आता तालिबान चालवत आहे. बांगलादेशसोबतचे आपले संबंध बिघडत चालले आहेत. बाजूचा केवळ भूतान आपल्यासोबत आहे तर इतर सगळ्या देशांशी संबंध बिघडले आहेत, हे लक्षात येत आहे. आपले शेजारी देश आपल्याला सोडून गेले आहेत. आपण एकटे पडले आहोत, हा खूप मोठा धोका असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भारताला बसणार फटका

जर्मन, फ्रांस हे देश देखील आपल्यापासून अंतर ठेवत आहेत. हे सरकार पुन्हा 2024 मध्ये जर निवडून आले तर इतर देश कायदा करतील की इतर देशातील किती लोक आपल्या देशात राहणार, याचा सगळ्यात जास्त फटका आपल्या भारताला बसणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. अजित पवार यांच्या विधानावर बोलताना आंबेडकर म्हणाले, ज्यांना कळत नाही त्यांनी यात बोलू नये असे मला वाटते.

(Edited By : Sachin waghmare)

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar News : 'वंचित'च्या आंबेडकरांनी मंत्री विखेंमुळे थोरातांसाठी वाजवली 'वॉर्निंग घंटा'
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com