Pune Lok Sabha Election 2024 Sarkarnama
पुणे

Pune Lok Sabha Election 2024 : निवडणूक खर्चात 'लाखोंची उड्डाणे'; आढळराव अव्वल तर कोल्हे, धंगेकरही नाहीत मागे...

Pune Shirur Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या या चारही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्याबाबत खुलासा करावा लागणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : नुकतंच मतदान पार पडलेल्या शिरूर (Shirur) आणि पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) निवडणुकीत उमेदवारांनी केलेला प्रचार खर्चाचा ताळेबंद समोर आला आहे. कुठल्या उमेदवारांनी निवडणुकीवरती किती खर्च केला, या बाबी समोर आले आहेत. शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणुकीवरती सर्वाधिक खर्च केला आहे. आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यानंतर पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) हे खर्चामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

निवडणूक आयोगाच्या उमेदवारांना नोटीसा -

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शिरूर आणि पुणे लोकसभेच्या उमेदवारांनी खर्चाचा ताळेबंद निवडणूक आयोगाला सादर केला आहे. मात्र या खर्चामध्ये तफावत असल्याचं निवडणूक आयोगाला आढळल्याने, आयोगाने शिवाजी आढळराव पाटील, मुरलीधर मोहोळ, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांना नोटीस पाठवले आहेत. या प्रचार खर्चातील तफावतीबाबत प्रत्यक्ष उपस्थित राहून तफावत दूर करण्यास सांगण्यात आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणी किती केला खर्च?

शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी निवडणुकीसाठी सर्वाधिक 74 लाख 97 हजार रुपये प्रचारावर खर्च केला आहे. या पाठोपाठ पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 69 लाख 41 हजार रुपये प्रचारावर खर्च केला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर शिरूरचे महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी ५३ लाख 69 हजार खर्च केला असून, पुण्यातील महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील 46 लाख 43 हजार रुपये निवडणुकीतील प्रचारावर खर्च केला आहे.

पुणे, शिरूर मतदारसंघांतील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची निवडणूक (Lok Sabha) आयोगाने तीन वेळा तपासणी केली आहे. 3 मे, 7 मे, 11 मे रोजी तपासणी करण्यात आली. मात्र तिन्ही तपासणीत शिरूरमधील आढळराव, कोल्हे आणि पुण्याचे मोहोळ, धंगेकर यांच्या निवडणूक खर्चामध्ये काही प्रमाणात तफावत आढळली आहे.

दरम्यान, प्रचार खर्चातील तफावतीबाबत आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या या चारही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्याबाबत खुलासा करावा लागणार आहे. याबाबत उमेदवारांकडून खुलासा न केल्यास हा खर्च त्यांना मान्य असल्याचे समजून संबंधित उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर 30 दिवसांत पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघांच्या खर्च निरीक्षकांसमवेत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हजर राहून खर्चातील तफावत दूर करण्याच्या सूचना करण्यात आले आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT