Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहे.ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लढत काँग्रेसचे अजय राय आणि बसपाचे अथर अली लारी यांच्याशी होणार आहे.याच धर्तीवर मोदी यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी भाजपची सत्ता असलेल्या 12 राज्याचे मुख्यमंत्री आणि 18 कॅबिनेट मंत्री यांच्यासह मित्रपक्षांचे नेतेमंडळीही हजर होते.यावेळी महायुती सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असलेला जिरे टोप भेट म्हणून दिला.यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Prafull Patel) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला.यावरुन आता राजकारण तापलं आहे. जगताप यांनी प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, "जिरेटोप" आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही ! अशी टीकेची झोड उठवली आहे.
प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले,रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे.... अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवण्णा, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना मुक्त सोडणारे ही बिभत्स बुध्दी कुठे.'असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यापूर्वी त्यांनी गंगा पूजन केले.तसेच कालभैरव मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.तसेच एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांची भेटही त्यांनी घेतली. अनेक नेत्यांनी त्यांच्या राज्याचं प्रतीक म्हणून पंतप्रधान मोदींना भेटवस्तूही दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही पंतप्रधान मोदी यांना शिवाजी महाराजांचा जिरेटोप भेट म्हणून दिला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.