Ravindra Dhangekar sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar: पराभवानंतर धंगेकरांचे हे 'दंगे' चर्चेत... 

Pune Lok Sabha Election 2024 Result : धंगेकरांच्या वर्किंग स्टाइलपासून पोलिस, एक्साइज, महापालिका आणि अधिकाऱ्यांविरोधातील आंदोलनेही चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातूनच आक्रमकतेचा नवा धंगेकर पॅटर्न पुढे आला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यात कसब्यातील निवडणुकीत बाजी मारणारे, तोच 'कॉन्फिडन्स' घेऊन लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या रवींद्र धंगेकरांची पराभवाची बेरीज-वजाबाकी केली जात आहे. त्यात धंगेकरांच्या वर्किंग स्टाइलपासून पोलिस, एक्साइज, महापालिका आणि अधिकाऱ्यांविरोधातील आंदोलनेही चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातूनच आक्रमकतेचा नवा धंगेकर पॅटर्न पुढे आला आहे. मात्र, या स्टाइलचाही धंगेकरांना लोकसभा निवडणुकीत कुठे फटका बसला नाही ना, याकडेही बोट दाखवले जात आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीत भाजपाला चारी मुंड्या चीत करून रवींद्र धंगेकर यांनी आपला विजय साकार केला. या विषयामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच नाव चर्चेत आलं. वाढलेल्या प्रसिद्धीचा फायदा घेत नंतरच्या काळामध्ये रवींद्र धंगेकर यांनी विविध मुद्द्यांवर सातत्याने आंदोलन केली. तसेच विविध मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवत सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला.

हि आंदोलन म्हणजे रवींद्र धंगेकर यांची स्टंट बाजी असून ते फक्त दंगे करत असल्याचा आरोप सातत्याने भाजप नेत्यांनी केला. कसबा पोटनिवडणुकी दरम्यान त्यांनी भाजप पैसे वाटत असल्याचं सांगत आंदोलन केलं. तोच कित्ता त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्व संध्येला देखील गिरवला. आमदार झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेमध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये वाद घालत काढता पाय घेतला. माझ्या मतदारसंघातील निधीवर भाजप घाला घालत असल्याची टीका त्यावेळी त्यांनी केली. नंतरच्या काळात देखील  धंगेकरांनी महापालिकेतील टक्केवारीवरून महापालिका आयुक्तांना घेरण्याचा प्रयत्न केला.

 ललित पाटील ड्रग्स प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी विधानसभे पासून ते ससून रुग्णालयापर्यंत सातत्याने आंदोलन केली या दरम्यान त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. नुकत्याच झालेल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणात देखील पोलिस पैसे घेऊन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आंदोलन केले. तसेच उत्पादन शुल्क विभागा पब वाल्यांकडून हप्ते घेत असल्याचा आरोप करत कार्यालया त्यांनी दंगा घातला. 

त्यामुळे आमदार झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनांना प्राधान्य दिल्याचं सातत्याने दिसून आले यामुळे कुठेतरी धंगेकर हे आपल्या मतदारसंघामध्ये लक्ष देण्यास कमी पडले का?  हा प्रश्न लोकसभा निवडणुकीमध्ये पडलेल्या मतदानावरून  पुढे येत आहे.  ज्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात त्याच मतदारसंघातून ते पिछाडीवर गेल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे राज्यभर प्रसिद्ध झालेले धंगेकर मतदार संघामध्ये काम दाखवण्यात कुठे कमी पडले का? असा प्रश्न चर्चेत आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT