Ravindra Dhangekar: ...इथं गणितं फिरली आणि धंगेकरांना बसला झटका 

Pune Lok Sabha Election 2024 Result : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक असणाऱ्या कॉग्रेस इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुणे कॅण्टोन्मेेट मतदार संघात रवींद्र धंगेकरांनी चांगले मताधिक्य मिळवले आहे.
Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Ravindra Dhangekar, Murlidhar MoholSarkarnama

 Pune News : गेल्या काही काळापासून पुणे लोकसभा मतदार संघ हा भाजपचा गड राहिला आहे. मात्र या निवडणुकीत भाजपने हा गड राखला असला तरी त्याचे बुरुज तितके मजबूत राहिलेले नाहीत . हे चित्र या लोकसभा निकालाने स्पष्ट केले.  त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक असणाऱ्या कॉग्रेस इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुणे कॅण्टोन्मेेट मतदार संघात रवींद्र धंगेकरांनी चांगले मताधिक्य मिळवले आहे.  

पुणे लोकसभेच्या इतर कोथरूड, वडगावशेरी, पर्वती , कसबा आणि शिवाजीनगर  विधानसभा   मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांना आघाडी मिळाली आहे. कोथरूड आणि पर्वती विधानसभा लोकसभा मतदार संघात मिळालेले मोठे मताधिक्य मोहळ यांना तरणारे ठरले.

कोथरूडमध्ये मुरलीधर माेहोळ  ७४ हजार ४०० तर पर्वतीमध्ये  २९ हजारांची आघाडी मोहळ यांना मिळाली. पुणे कॅन्टोन्मेंट रविंद्र धंगेकर यांचा वारू सुसाट धावला त्याठिकाणी त्यांना  १६ हजारांचे लीड मिळाले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सामना जवळपास बरोबरीत सुटला असल्याचे पहिला मिळाले. या ठिकाणी अवघे ३ हजारांचे लीड मोहळ यांना घेता आले. तर कसब्यात मोहोळ यांना १५ हजारांचे तर वडगावशेरी येथे १४ हजारांचे लीड मिळाले आहे. 

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुती कडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे एमआयएमचे अनिस सुंडके यांच्यासह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर यांच्यात झाली.

कोथरूड, शिवाजी नगर , पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत मात्र  रवींद्र धंगेकरांच्या रूपानं कसब्याची एकमेव जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे.  

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी भाजपला पराभवाची धुळ चारली. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात अली होती.  

सुरवातीला  एकतर्फी वाटणारी  निवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी रंगत आणली.  पण काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फटका रविंद्र धंगेकर यांना बसल्याचे पहिला मिळाले . या निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराच्या टप्पात विर्दभातील दहा आमदार कॉग्रेस नेतृत्वाने गटबाजी रोखण्यासाठी आणले होते. पण त्याचा अपेक्षित  परिणाम झाला नाही.  या निवडणुकीत शिवसेेनेच्या ठाकरे गट देखील नाराज असल्याच्या वार्ता अधून मधून येत राहिल्या.

Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Nitish Kumar and Tejashwi Yadav On Same Flight : नितीश कुमार अन् तेजस्वी यादव करणार खेळ? दिल्लीचं राजकारण हादरणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com