Pune Congress : मोहोळ जिंकले पण सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे डेंजर 'झोन' मध्ये

Pune Lok Sabha Election 2024 Result : पुण्यातील या विधानसभा मतदार संघात होऊ शकतो कॉग्रेसचा आमदार, पुणे कॅन्टोन्मेेंट मतदारसंघातील सुनील कांबळे आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सिद्धार्थ शिरोळे हे आमदार असतील का ? याचा विचार करायला लावणारे आकडे
Pune congress
Pune congressSarkarnama

Pune News : मागील विधानसभेच्या निवडणुकीत काठावर पास झालेल्या सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे यांना पुढच्या विधानसभेसाठी 24 तास नव्हे तर दिवसाची रात्र करून 32 तास अभ्यास लागणार आहे. मोहोळ खासदार झाले असले तरी पुढील विधानसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेेंट मतदारसंघातील  सुनील कांबळे आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सिद्धार्थ शिरोळे हे आमदार असतील का ? याचा विचार करायला लावणारे आकडे या मतरदार संघात आले आहे. परिणामाची या दोन मतदार संघावर कॉग्रेस डोळा असणार आहे.

विधानसभा २०१९ च्या निवडणुकीमध्ये पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचा बोलबाला राहिला. दोन राष्ट्रवादी काँग्रेसला तर सहा जागा भाजपाने आपल्या खिशात घातल्या. या हा जागांमधील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघा मधील विजय हा तितकासा आश्वासक नव्हता.  काही हजारांच्या फरकाने तिथल्या काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला.

या लोकसभा निवडणुकीचे चित्र पाहिलं तरी या मतदारसंघांमधून काँग्रेससाठी सकारात्मक चित्र समोर आला आहे.  कॅन्टोन्मेंट मध्ये रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 16000 लीड घेतल आहे. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये सामना बरोबर ती सुटल्या चित्र सध्या दिसत आहे.  या मतदारसंघांमध्ये मुरलीधर मोहळ यांना अवघे तीन हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघातील भाजप आमदार सुनील कांबळे आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठीचे धोक्याची घंटा असून मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसच्या रमेश बागवे आणि दत्ता बहिरट  यांच्यासाठी आशीचा किरण दाखवणारी आहे.

त्यामुळेव आगामी काळामध्ये भाजपला पुणे शहरामध्ये आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. या भागातून उमेदवार बदलण्याच्या देखील शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभा मतदारसंघ मताधिक्य

कोथरूड   मुरलीधर माेहोळ  ७४ हजार ४००


पर्वती    मुरलीधर मोहोळ    २९ हजार


शिवाजीनगर  मुरलीधर मोहोळ   ३ हजार


कसबा    मुरलीधर मोहोळ  १५हजार


वडगावशेरी मुरलीधर मोहोळ १४ हजार २००


पुणे कॅन्टोन्मेेंट रविंद्र धंगेकर १६ हजार

Pune congress
Ravindra Dhangekar: ...इथं गणितं फिरली आणि धंगेकरांना बसला झटका 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com