Pune Loksabha Election : पुण्यातील मतदान केंद्रात पोलिस आणि मतदारांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ उडताना दिसत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील शास्त्री नगर भागात मनसे नेते, माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि होमगार्ड यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
मतदान केंद्राच्या आत (EVM) मोबाइल घेऊन जाण्यास परवानगी नसल्याचे सांगत किशोर शिंदेंना होमगार्डने अडवले. त्यावरून किशोर शिंदे यांनी चढ्या आवाजात जाब विचारला. 'तुला अधिकार किती तू बोलतोस किती, आपण होमगार्ड आहात लोकांशी नीट बोला अशा शब्दात झापलेही. चिडलेल्या शिंदेनी, मीही 'होमगार्ड'ची परीक्षा दिली आहे.'
कोथरूडमधील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्राबाहेर परिसरात प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. मतदारांचे नाव गायब होण्यापासून मतदारांचे क्रमांक देखील चुकले आहेत, त्यामुळे मतदार संताप व्यक्त करत आहेत. मतदारांच्या तक्रारी आल्यानंतर शाळेत जाऊन रांगेत उभ्या असलेल्या किशोर शिंदे (Kishor Shinde) यांना मोबाइल घेऊन आत येता येणार नाही असे सांगून बाहेर काढण्याचा प्रयत्न होमगार्डने केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कायद्याची आणि नियमाची भाषा सांगितल्याने किशोर शिंदेंचा पारा चढला, मतदान केंद्रावरील नियम सांगून गप्प करण्याचा प्रयत्न केला गेला. कायदा समजवून सांगण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्ते देखील भडकले आणि मतदान केंद्राबाहेर वाद निर्माण झाला होता. परंतु वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर वाद निवळला.
चिडलेल्या किशोर शिंदेंनी आपणही होमगार्डची परीक्षा दिली हे आवर्जून सांगितले. किशोर शिंदे हे मनसेचे सलग दोनदा म्हणजे 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत नगरसेवक होते. तसेच कोथरूड मधून आमदारकीची मनसेच्या तिकिटावर निवडणुक लढले आहेत. त्यामुळे ते बडे नेते मानले जातात. परंतु त्याच्यात भागात अडवल्यामुळे ते चांगलेच भडकले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.