Vasant More Jitendra Awhad sarkarnama
पुणे

Vasant More News : 'बारामती, शिरुरमध्ये कला दाखवून देईन', वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांना इशारा

Pune Loksabha : वसंत मोरे यांचा वंचितच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पुण्याची निवडणूक झाल्यानंतर मोरे महाराष्ट्रभर वंचितच्या उमेदवारांचा प्रचार करतील.

सरकारनामा ब्यूरो

सागर आव्हाड

Pune Loksabha : वसंत मोरे हे काय कलाकार आहेत, त्यांची कलाकारी कायम आहे हे मला समाजली नाही, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी वसंते मोरेंवर निशाना साधला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या मतांची विभाजन करण्यासाठी वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आला संशय देखील आव्हाड यांनी व्यक्त केला होता. आव्हाडांच्या या टीकेला वसंत मोरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

'जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माझी कुठली कला पाहिली हे मी त्यांना विचारणार आहे. त्यांनी जी पाहिली ती कला नाही. मी गारुडी आहे . मी माझी कला आता शिरूर लोकसभा मतदारसंघ बारामती मतदारसंघात दाखवून देईल, असा इशारा वसंत मोरेंनी (Vasant More) जितेंद्र आव्हाड यांना दिला. तसेच जितेंद्र आव्हाड मोठे कलाकार आहेत. त्यांनी फेसबुक पोस्ट वरून घरात मारहाण करणे, लोकांना धमकावणे अशा अनेक कला केल्या आहेत, असा टोला देखील मोरे यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वसंत मोरे यांचा वंचितच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पुण्याची निवडणूक झाल्यानंतर मोरे महाराष्ट्रभर वंचितच्या उमेदवारांचा प्रचार करतील. वंचितमध्ये काम करण्याच्या बाबत वसंत मोरे म्हणाले की, राज ठाकरे व आंबेडकर दोघांचे विचार वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे काही वेळ मला वंचितमध्ये जाईल. मी वंचित लोकांसाठी यापूर्वीही काम करत होतो.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी वसंत मोरे यांना उमेदवारी दिली नाही ना? मोरेंना उमेदवारी देऊन मुरली मोहळ यांची मुरली वाजवायची नाही ना? वंचित आणि वसंत मोरे यांचे गणित मला कळले नाही. वसंत मोरे कलाकार आहेत. त्यांची कलाकरी काय आहे, हे मला समजले नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

(Edited By Roshan)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT