Nitesh Rane On Sanjay Raut: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात बोलताना नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. राज यांच्या भूमिकेवरुन आता राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महायुतीतील नेते ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करत आहेत. तर आघाडीचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत.
राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) याच भूमिकेवरुन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. तर राज ठाकरे यांनी महायुतीला समर्थन दिल्यामुळे संजय राऊतांना मिरच्या झोंबल्या असल्याचं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे मनसेच्या भूमिकेवरुन शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, मागील काही दिवसापासून महाराष्ट्राची लूट सुरू आहे. राज्यात खोक्याचे घाणेरडे राजकारण सुरू असून नरेंद्र मोदी आणि अमित शहा (Narendra Modi And Amit Shaha) याचे सूत्रधार आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देतोय, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल.
राज्यातील ओवाळून टाकलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपने जवळ घेतलं आहे. त्यातले हे एक 'नमो'निर्माणवाले आहेत का? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील सर्व ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्याभिचारी, गुंडांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणे हा व्याभिचार नाही का? आणि अशा व्याभिचारी व्यासपीठावर तुम्ही पाऊल ठेवले असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल, शिवाय तुमच्या फाईल्स उघडल्या म्हणून तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला का? असं टोलाही राऊतांनी लगावला.
संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करताच भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, हिंदू राष्ट्र भक्कम करण्यासाठी पाठिंबा दिला याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, राज ठाकरेंनी समर्थन दिल्यामुळे संजय राऊतांना मिरच्या झोंबल्या आहेत. उबाठा सेना आता सिल्वर ओकेसेना झाली आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली. तसेच खोक्यांचे कंटेनर भरून लूट करणारा कलानगरच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो, अशी बोचरी टीकाही राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.