Manoj Jarange Patil Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Patil : "जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही..."; भाजप नेत्याच्या 'त्या' वक्तव्याला जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

Manoj Jarange Patil On BJP Leaders : मनोज जरांगे पाटील स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करु नये, असं वक्तव्य भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी भाजप नेत्यांना टार्गेट केलं आहे.

Jagdish Patil

Pune News, 11 August : अनिल बोंडे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय बोलले त्याकडे मी लक्ष देत नाही, मी माझ्या समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आणणारच, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांना टार्गेट केलं आहे.

मनोज जरांगे पाटील स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करु नये, असं वक्तव्य भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी भाजप (BJP) नेत्यांवर निशाणा साधला.

सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) हे जनजागृती आणि शांतता रॅली काढत आहे. प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्याबाबत भूमिका मांडत आहेत. त्यांची ही रॅली रविवारी (11 ऑगस्ट) पुण्यात आली होती.

या रॅलीला पुणेकरांनी (Pune) चांगला प्रतिसाद दिला. यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांची सकाळपासून भर पावसात वाट पाहत होते. या रॅली दरम्यान मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत आपल्या मुद्द्यांवर ठाम रहात सरकारला आणि त्यांच्या मागणीला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, पंकजा मुंडे यांनी माझे आभार मानले पाहिजेत, त्यांना विधान परिषद तरी मिळाली. मी त्यांना पाडा असं बोललो नाही. तसंच प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल मी काहीही बोलणार नाही. पुढं काहीही होऊ शकतं असं सूचक विधान त्यांनी यावेळी केलं.

"मी पुण्यातील समाजाचा आभार मानतो, आरक्षणाच्या लढ्यामध्ये माझ्यासोबत ते राहिले. ही लढाई माझी एकट्याची नाही. सर्व समाजाची आहे आणि मी माझ्या समाजासोबत शेवटपर्यंत राहणार. माझा समाज माझ्यासोबत आहे, हीच माझी ऊर्जा आहे." अशा शब्दात त्यांनी पुणेकरांचे आभार मानले.

29 तारखेला मोठा निर्णय

तसंच, ओबीसी समाजातील काही लोक आणि मराठा समजातील काही लोक मला बदनाम करत आहेत. पण आरक्षण मिळवायचे असेल तर आपली माणसे विधानसभेत जायला हवीत 288 जागांची चाचपणी पूर्ण झाली आहे. लवकरच आमचे उमेदवार पुढं येतील. 29 तारखेला अंतरवली मध्ये मोठा निर्णय घेणार असल्याचंही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं.

ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच

अनिल बोंडे आणि देवेंद्र फडणवीस काय बोलले त्याकडे मी लक्ष देत नाही, मी माझ्या समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आणणारच, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांना टार्गेट करत आपण आपल्या भूमीकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT