Maratha Reservation Sarkarnama
पुणे

Maratha Reservation Protest : मराठा समाज आक्रमक; नेत्यांचे फोटो हटवले, पुण्यात नेमकं काय घडलं?

Chaitanya Machale

Pune Political News : मराठा समाजाने हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाला राज्य सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वेगवेगळी आश्वासने देत राज्य सरकारने मराठा समाजाची केवळ बोळवण करण्याचे काम केल्याचा आरोप आता मराठा आंदोलक करत आहेत. यातूनच लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करून इतर पक्षांच्या उमेदवारांचा पराभव करण्याचा ठराव आंदोलकांनी केला आहे. (Latest Political News)

मराठा समाजाला (Maratha Resrvation) हक्काचे आरक्षण मिळावे आणि यामुळे मराठा समाजातील तरुण-तरुणींना शिक्षणात, नोकरीत तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये काही प्रमाणात फायदा घेता यावा, यासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या अध्यक्षतेखाली काही महिन्यांपासून राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे तसेच सगळे सगेसोयऱ्यांबाबत राज्य सरकारने मान्यता देऊन आरक्षण द्यावे, या दोन मागण्यांसाठी जरांगे आग्रही आहेत. Maratha Reservation Protest

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाने दोन महिन्यांपूर्वी जानेवारी 2024 मध्ये अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढला होता. हा मोर्चा मुंबईला पोहोचल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाचे नेते जरांगे यांच्याशी चर्चा करून पुढील काही दिवसांत याबाबतचा अध्यादेश राज्य सरकार प्रसिद्ध करेल, असे जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेश काढला आहे. मात्र, त्यामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेली ही भूमिका अन्यायकारक असून, याविरोधात जरांगेंनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकार सगेसोयरे यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.

राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काही उमेदवार उतरवून स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. गावागावांत लावण्यात आलेले राजकीय नेत्यांचे फ्लेक्स, बॅनर मराठा आंदोलकांनी काढले जात आहेत. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जात नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात फिरू देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाही मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका बसला. लोकसभा मतदारसंघात विविध भागात लावलेले सुळेंचे पोस्टर हटवण्यात आले. इंदापूर तालुक्यातील कांदलगाव या ठिकाणचे पोस्टर आणि बॅनर काढण्यात आले आहेत. मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयर्‍यांच्या मुद्द्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय आंदोलकांच्या वतीने घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या या आंदोलकांचा फटका यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही बसलेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका आता सर्वच नेत्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT