Mumbai News : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज तोफ डागली. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं टेररिझम त्यांनी उभं केले होतं. त्यांच्या लुटारू सेनेचे दहशतीचे वातावरण होते, अशी टीका सोमय्या यांनी केली, तर उद्धव ठाकरे यांचे दहशतीचे वातावरण आम्ही संपवलं असून, त्याबद्दल समाधान वाटत असून, त्यांची जी अवस्था झाली आहे, ती बघून वाईट वाटतं, असा टोलाही किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
सोमवारी किरीट सोमय्या (Kirit Somaiaya) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची जी अवस्था झाली आहे, ती बघून वाईट वाटतं. त्यांच्या फायनान्स पार्टनरने त्यांची साथ सोडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच लक्ष्य आहे, भारताला भ्रष्टाचारमुक्त करायचं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या लुटारू सेनेचे दहशतीचे वातावरण होते.
गेली अनेक वर्षे त्यांनी भ्रष्टाचाराचं टेररिझम उभं केले होतं. ते वातावरण आज आम्ही संपवलं आहे, त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत झाला आहे. आता भ्रष्टाचारमु्क्त महाराष्ट्राची लढाई सुरू झाली आहे. यापुढे कोणी कुठल्याही पक्षातून कोणी कुठेही आला तरी महाराष्ट्रात भ्रष्टाचार होऊ देणार नाही. किरीट सोमय्या यांची भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची लढाई आणखी जोमाने सुरू राहणार, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला. वायकर यांच्याविरोधात सोमय्या यांनी आरोप करत सर्वप्रथम जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचे प्रकरण उकरून काढले होते. आता वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ईडी (ED) त्यांची पाठ सोडेल, अशी शक्यता आहे. याबाबत सोमय्या यांना विचारले असता ते म्हणाले, मी रवींद्र वायकर यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात माझे काम पार पाडले. आता पुढील जबाबदारी ही तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेची असल्याचे सांगत या प्रकरणातून त्यांनी आपले हात झटकले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत या वेळी किरीट सोमय्या यांना विचारले असता ते म्हणाले, मी आरोप केलेली सर्व प्रकरणे न्यायालयात गेली आहेत. रोहित पवार यांच्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. आता शरद पवार हे रोहित पवारांची एवढी बाजू घेत आहेत. पण कर्ज कोणी मिळवले आणि कर्ज कुठे फिरवले, हेदेखील पवारसाहेबांनी सांगावे. याच कारणामुळे रोहित पवार यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.