Sharad Sonawane 1 Sarkarnama
पुणे

Sharad Sonawane atrocity act : MLA सोनवणेंच्या अडचणी वाढल्या, ॲट्रॉसिटीनुसार कारवाई अन् आमदारकी रद्द...

Yavatmal Tribal Protest Demands Sharad Sonawane Disqualification & Atrocity Act Action : आमदार शरद सोनवणे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई आणि आमदारकी रद्दसाठी आदिवासी संघटनांचे यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Pradeep Pendhare

Pune MLA protest Yavatmal : आदिवासी समाजाच्या प्रश्नावर जुन्नर इथं सरकारी बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार शरद सोनवणेंची जीभ घसरली अन् त्यांनी ‘आदिवासी खात्याला मूर्ख मंत्री भेटला आहे, चोर साला, चुXXX...’ असे शब्द वापरले.

आमदार सोनवणेंचा या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे शरद सोनवणे यांच्या आता अडचणी वाढू लागल्या आहेत. यवतमाळ इथल्या आदिवासी संघटनेने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना निवेदन देत शरद सोनवणेंविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई आणि आमदारकी रद्दची मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्राचार्य डाॅ. अशोक ऊईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्री खातं आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी प्रश्नांवर बैठकीतच मंत्री ऊईके यांच्याविषयी खालच्या भाषेत विधान केले. यावरून आता वादंग सुरू झाला आहे.

यवतमाळमधील (Yavatmal) विविध आदिवासी संघटना आमदार शरद सोनवणेंविरोधात चांगल्या आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन आदिवासी संघटनांनी आमदार शरद सोनवणे यांचेविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची व त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

आमदार सोनवणे यांनी आदिवासी समाजाचे नेते व राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांचेबाबत खालची भाषा वापरून आदिवासींबरोबर सरकारचा देखील अपमान केला आहे. आमदार सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास राज्यभर संतप्त परिणाम उमटतील, असा इशारा ट्रायबल फोरम, आदिवासी परधान जमात संघटना आणि उलगुलान संघटनेने दिला आहे.

अजितदादांना फटकारलं

उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी यावरून आमदार सोनवणे यांना चांगलेच फटकारलं आहे. 'काही लोक विकृत असतात. त्यांना प्रत्येकाला उत्तर देत बसलो तर मला दिवस पुरायचा नाही', अशा शब्दात अजितदादांना आमदार सोनवणे यांना फटकारलं आहे.

शरद सोनवणेंनी पलटी मारली

आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचा खुलासा केला. आपण हे मंत्री महोदयांना बोललो नव्हतो, तर घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांबद्दल सुनावले होते. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई हे समाजाच्या हिताचे काम करत नाहीत. त्यांच्या विरोधात तक्रारीही असल्याचा दावा आमदार सोनवणे यांनी म्हटले आहे.

आमदार सोनवणे यांना नोटीस

अपक्ष निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शरद सोनवणेंनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्दसाठी ॲड. विजय कुऱ्हाडे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावरून नार्वेकरांनी सोनवणेंना नोटीस काढली आहे. 'मला नोटीस आली आहे. परंतु मला पाच वर्षे काहीच होणार नाही', असा दावा आमदार सोनवणेंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT