लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या पुरुषांचं आता काही खरं नाही? अजितदादांसह बावनकुळेंचा थेट इशारा; म्हणाले, 'पै अन् पै...'

Ajit Pawar And Chandrashekhar Bawankule On ladki bahin yojana recover : महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून प्रश्न चिन्ह पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. सरकारी कर्मचारी महिलांची नावे या योजने असल्याचे उघड झाल्यानंतर आता पुरूषांची नावे उघड झाली आहेत.
Ajit Pawar And Chandrashekhar Bawankule On ladki bahin yojana
Ajit Pawar And Chandrashekhar Bawankule On ladki bahin yojana sarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. ‘लाडकी बहीण’ या महिलांसाठीच्या योजनेचा गैरवापर करून तब्बल 14,298 पुरुषांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

  2. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून वसुलीचे आदेश दिले आहेत.

  3. या पुरुषांवर गुन्हे दाखल करण्याची शक्यता असून सरकारी निधी परत मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार आहेत.

Pune/Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना गोरगरिब महिलांना डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आली होती. मात्र याचा अनेकांनी लाभ उचलला. ज्यात सरकारी कर्मचारी महिलांचाही समावेश होता. पण आता आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली असून तब्बल 14 हजार 298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. पुरुषांनी लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारला आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या पुरुषांकडून हे पैसे वसुल केले जातील. गरज पडल्यास गुन्हा दाखल करू असाही इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यामुळे ज्या पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून पै अन् पै आता वसून केली जाणार आहे. (Maharashtra Government to Recover Funds from 14,298 Men Who Illegally Claimed Benefits Under Ladki Bahin Yojana Meant for Poor Women)

गोर गरिब महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर अनेकांनी डल्ला मारला असून याप्रकरणी आता सवाल उठत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारला घेरलं आहे. त्यांनी, सरकारने चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेचे पैसे गेल्याची टीका केलीय. तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डेट्यातून देखील गंभीर बाबी समोर आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत देखील तब्बल 14 हजार 298 पुरुषांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. आता सरकार या अपात्र पुरुषांकडून पैसे वसूल करणार का असा प्रश्न विचारला जातोय. तर प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या टीकेनंतर पुरूषांनी योजनेचे पैसे लाटलेले असल्यास कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

Ajit Pawar And Chandrashekhar Bawankule On ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजनेवर पुरुषांचा 'डल्ला'! 14 हजार पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 21कोटीला गडवलं

तब्बल 14 हजार 298 पुरुषांनी थोडेथाडके नाही तर 21 कोटींहून अधिक रक्कमेवर डल्ला मारल्याने या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केलीये. तर या पुरुषांना योजनेत कोणी घुसवलं? छाननी करताना हे कसं समोर आले नाही? नेमका कोणी आणि कसा डल्ला मारला असे प्रश्न उपस्थित केले जातायेत.

यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या पुरुषांकडून हे पैसे वसुल केले जातील ते सहकार्य करणार नाहीत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. अजित पवार यांनी, ज्या गरिब महिलांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. यात मधल्या काळात काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यात सरकारी नोकरी करणाऱ्या काही महिलांचा समावेशही होता. ती नावे कमी करण्यात आली आहेत.

Ajit Pawar And Chandrashekhar Bawankule On ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana : नाराज लाडक्या बहि‍णींना फडणवीस सरकारचा दिलासा; जुलै महिन्याचे पैसेही मिळणार अन् निवडणुकीपर्यंत पडताळणीही थांबणार

पण आता या योजनेमध्ये पुरुषांची नावं येण्याचं काहीच कारण नाही. मात्र हे सिद्ध झाल्यास जितके पैसे त्यांनी घेतले असतील ते सर्व आम्ही वसूल करू. त्यांनी सहकार्य केलं तर ठिक अन्यथा आम्ही कारवाई करण्यास मागे -पुढे पाहाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

दरम्यान याच प्रकरणावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, सरकारने या संदर्भात आधीच भूमिका स्पष्ट केली असून चुकीच्या पद्धतीने ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतले आहे, त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही. पण महिलांचे पैसे जर पुरुषांनी घेतले असतील तर गुन्हा दाखल व्हायला हवा. पैसेही वसूल केले पाहिजे, असे बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar And Chandrashekhar Bawankule On ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना पैसे यायचे बंद झालेत... भाजप आमदाराने फडणवीस सरकारला विधानसभेतच उघड पाडलं

1. लाडकी बहीण योजना कोणासाठी होती?
– ही योजना राज्यातील गरीब महिलांसाठी होती.

2. पुरुषांनी याचा गैरवापर कसा केला?
– अनेक पुरुषांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे महिला म्हणून नोंदणी करून आर्थिक लाभ घेतला.

3. शासन यावर काय कारवाई करणार आहे?
– शासन या सर्व 14,298 पुरुषांकडून पैसे वसूल करणार असून, गरज पडल्यास गुन्हेही दाखल करण्यात येतील.

4. अजित पवार आणि बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
– त्यांनी ही बाब अत्यंत गंभीर मानली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट केले.

5. लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे कोण घेऊ शकते?
– ही योजना केवळ पात्र महिला लाभार्थींनाच मिळण्यास पात्र आहे; नवीन नियमावलीही लवकरच लागू होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com