Pune MLC Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा घेत चाचपणी केली. राज्य निवडणुक आयोगाकडून विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून या जागेवर दावा सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष, आजी-माजी आमदार यांची शुक्रवारी बारामती होस्टेल येथे आढावा बैठक झाली.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार चेतन तुपे, शंकर मांडेकर, सुनील शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, राजेंद्र कोरेकर, माजी आमदार विलास लांडे, दिलीप मोहिते, सुरेश घुले, योगेश बहल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पवार यांनी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची संख्या जास्त असल्याने पक्षाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी पवार यांच्याकडे यावेळी करण्यात आली. तसेच उमेदवार निवडीचे सर्व अधिकार यावेळी पवार यांच्याकडे देण्यात आले. दरम्यान, पवार यांनीही निवडणुकीबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली. दरम्यान, या बैठकीमध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली.
"विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. इच्छुकांनी पवार यांच्याशी चर्चा केली. उमेदवार देण्याबाबत पवार यांना अधिकार दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. उमेदवारीसाठी खुपजण इच्छुक आहेत. प्रत्येक पक्षाला निवडणुक लढण्याचा अधिकार आहे.' असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.