NCP Pune MLC  Sarkarnama
पुणे

Pune MLC Election : पुण्यात राष्ट्रवादीकडून भाजप नेत्याच्या मुलाला विधानपरिषद उमेदवारी : पार्थ पवारांचा धक्कादायक निर्णय

Vikram Kakade NCP candidate for Pune MLC : पुण्यातील जागेवर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार कोण द्यायचा यासाठी रविवारी रात्री पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जवळपास पाच तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

Jagdish Patil

Pune MLC Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. अनेक बैठकांनंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालं आहे. अंतिम निर्णयानुसार भारतीय जनता पक्ष 11, एकनाथ शिंदेंची शिवसेना 4, तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

या जागावाटपात पुणे आणि रायगडची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिंदेसेनेला मात्र 4 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. अशातच आता पुण्यातील जागेवर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार कोण द्यायचा यासाठी रविवारी रात्री पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जवळपास पाच तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीनंतर पुणे राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयात काल रात्री 8.30 वाजता उमेदवार निश्चित करण्या संदर्भात ही बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय काकडे देखील उपस्थित होते.

ही जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे हे माजी आमदार इच्छुक होते. याशिवाय अजित गव्हाणे, रणजित शिवतारे, दीपक मानकर यांचीही नावे चर्चेत होती.

मात्र, अखेर रात्री पार पडलेल्या बैठकीत विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विक्रम काकडेंची पार्थ पवारांचे निकटवर्तीय अशी ओळख आहे. तर भाजप नेते, माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र असलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी देत पार्थ पवारांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपापले उमेदवार निश्चित झाले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT