

Pune News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम मतदार यादीत एकूण ८६७ मतदारांचा समावेश असून, यामध्ये ४४१ पुरुष आणि ४२६ महिला मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघ नोंदणी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
११ मतदान केंद्रांची निश्चिती
या आगामी निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी विविध भागांत खालीलप्रमाणे केंद्रे असणार आहेत:
१) श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी स्कूल (जुनी दगडी हेरिटेज इमारत), शिवाजीनगर, पुणे
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पब्लिक स्कूल (प्राथमिक शाळा), खराळवाडी, पिंपरी चिंचवड
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंचर
४) महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर
५) विद्याधाम प्रशाला, शिरूर
६) नवीन प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय), दौंड
७) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल (मुलींची शाळा), बारामती
८) एमईएस वाघिरे हायस्कूल, सासवड
९) श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कन्याशाळा, भोर
१०) न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा, वडगाव मावळ
११) रयत शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्यालय, माळवाडी, हडपसर
या लोकप्रतिनिधींना असणार मतदानाचा अधिकार
या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र सदस्यांनाच मतदानाचा अधिकार असतो. त्यानुसार पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच जिल्ह्यातील विविध कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पात्र लोकप्रतिनिधींचा मतदार म्हणून यादीत समावेश करण्यात आला आहे.
येथे पाहता येणार मतदार यादी:
नागरिकांना आणि संबंधित उमेदवारांना ही अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तसेच जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्ह्यातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणूक विभाग कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.