Ravi Ran Sarkarnama
पुणे

Ravi Rana Vs Sanjay Raut : ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्वात काम करणार? संजय राऊत यांनी केलाय खुलासा

Pune MP Sanjay Raut MLA Ravi Rana Uddhav Thackeray CM Devendra Fadnavis : आमदार रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या दाव्याला संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आमदार रवी राणा यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून याबाबतची छुपी रणनीती आखण्यात येत आहे.

या सर्व रणनीतीपासून संजय राऊत यांना अंधारात ठेवून असल्याचा दावा देखील रवी राणे यांनी केला आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यामध्ये संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांचे संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, "विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये विविध पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली". यामध्ये काहींनी स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे, तर काहींनी महाविकास आघाडी म्हणूनच महापालिकेला सामोरे जाण आवश्यक असल्याचं सांगितलं. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही आगामी महापालिका निवडणुका या ताकदीने लढू, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडी (MVA) ही मजबुतीने उभी आहे. महाविकास आघाडीचा आम्ही एक भाग आहोत. आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो मुंबई महापालिकेसाठी आहे. मुंबईची परिस्थिती, मुंबईची रचना आणि मुंबईचे विषय वेगळे आहेत.

महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी निर्माण झाले, तर इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी झाली होती. या आघाड्यांचा उपयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कसा करण्यात, यावा याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे हे आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारतील आणि तशी छुपी रणनीती सुरू असल्याचं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, "रवी राणा यांची नेमणूक जे. पी. नड्डा यांच्या जागी केली आहे का? त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आला आहे का? शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. शिवसेनेला मोठी परंपरा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ती परंपरा सुरू झाली आहे". शिवसेना पक्षाची स्थापना झाली तेव्हा, त्या रवी राणांनी त्यांचा जन्म ही झाला नव्हता, असं म्हणत राऊत यांनी या विषयावर अधिकच बोलणं टाळलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT