Chhava Film : मंत्री सामंतांनी फटकारले, 'छावा'चे दिग्दर्शक उत्तेकर राज ठाकरेंच्या भेटीला; काय निघाला तोडगा?

Director Laxman Utekar MNS President Raj Thackeray Mumbai Hindi language film Chhava Chhatrapati Sambhaji Maharaj : छावा चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाल्याने दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
Chhava Film
Chhava FilmSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित, अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अडचणीत सापडला आहे. या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्यानं त्यावरून वाद निर्माण झाला आहे. ही दृश्ये वगळण्याची जोरदार मागणी होत आहे. 'छावा' चित्रपटातील या दृश्यांवर शिवप्रेमींसह राज्यातील काही मंत्र्यांनी आपेक्ष नोंदवला आहे.

शिवप्रेमींनी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. तर मंत्री उदय सामंत यांनी देखील फटकारले. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी 'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा लेजिम वाजवतानाचा सीन काढून टाकणार असल्याचे जाहीर केले.

Chhava Film
ADCC Bank Recruitment : जिल्हा बँकेतील 700 जागांची भरती अडकणार? 'या' मुद्यांवर पुन्हा विरोध सुरू

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी ही घोषणा केली. शिवप्रेमी या दृश्यावर नाराज आहेत, त्यामुळे ते दृश्य चित्रपटात (Film) दिसणार नाही, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. राज ठाकरे यांना भेटताना 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह अमेय खोपकरही उपस्थित होते.

Chhava Film
Dinvishesh 27 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

'छावा' हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनला आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. मात्र, या चित्रपटातील काही दृश्यांमुळे संभाजी महाराजांच्या सन्मानाला धक्का पोचत असल्याचा दावा शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, या वादाला तोंड फुटले. वास्तविक, राज्याभिषेकानंतर संभाजी महाराज आणि राणी येसूबाई नाचत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यावरून शिवप्रेमी नाराज आहेत.

मंत्री उदय सामंत यांनी देखील चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेतला होता. ते म्हणाले, "संभाजी महाराजांवर हिंदी चित्रपट बनत आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र त्यात काही आक्षेपार्ह दृश्ये आहेत. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अशा परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी योग्य ती कारवाई करावी".

मंत्री उदय सामंत यांच्या या प्रतिक्रियेनंतर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला महत्त्व आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com