Vote counting scene during Pune Municipal Corporation elections, where several candidates secured narrow victories with margins under 200 votes, reflecting closely fought ward-level contests. sarkarnama
पुणे

Pune Mahapalika : पुण्यात अटीतटीच्या लढतीत 5 उमेदवार काठावर पास; भाजपच्या एका उमेदवाराचा अवघ्या 55 मतांच्या आघाडीवर विजय

Pune Municipal Election Results : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला असला तरी शहरातील पाच उमेदवार अवघ्या 55 ते 228 मतांच्या फरकाने काठावर विजयी ठरले, अटीतटीच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महापालिका निवडणूकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे. 165 जागांपैकी 119 जागांवर भाजपने विजय साकार केला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने 27 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अटीतटीची लढत झाली. या अटीतटीच्या लढतीमध्ये शहरातून 5 उमेदवार हे काठावर पास झाले असल्याचं समोर आला आहे. यामध्ये भाजपचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार काठावर पास झाले असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये खरी लढत झाली. अनेक ठिकाणी उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाल्याचे पाहायला मिळालं. अगदी 50 जागांवर विजयी उमेदवाराच्या मार्जिन हे फक्त हजारच्या आत असल्याचं पाहायला मिळालं.

पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये मात्र भाजपचे उमेदवार बापू मानकर यांनी मात्र तब्बल 28 हजारच लीड घेतल्याचे पाहायला मिळालं. हा पुणे शहरातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. एवढा मोठा विजय साकारत असताना दुसरीकडे मात्र पुणे शहरातील 5 उमेदवार हे काठावर पास झाल्याचे दिसून आले.

प्रभाग क्रमांक 17 अ मधून भाजपचे खंडू लोंढे यांचा अवघ्या 55 मतांनी विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक 22 ड काशेवाडी-डाइस प्लॉट येथून भाजपाचे (BJP) विवेक यादव यांनी 62 मतांनी विजय मिळवला. त्यांनी माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे सुपुत्र काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांचा पराभव केला आहे.

तसेच प्रभाग: 2 ब (फुलेनगर-नागपूर चाळ) येथून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे उमेदवार रवी टिंगरे यांचा 138 मतांनी विजय झाला आहे. ज्या आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिली म्हणून राष्ट्रवादीवर टीका झाली त्या आंदेकर कुटुंबातील असलेल्या लक्ष्मी आंदेकर या भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करून अवघ्या 141 मतांनी विजयी झाले आहेत. त्या प्रभाग क्रमांक 23 क रविवार पेठ नाना पेठ येथून निवडणूक लढवत होत्या. तसेच जनता वसाहत येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले सूरज लोखंडे हे 228 मतांनी विजय झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT