Dinanath Mangeshkar Hospital latest News : मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटला अखेर पुणे महापालिकेडून मिळकतकर वसुलीसाठी नोटीस बजावली गेली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने ही नोटीस जारी केली गेली आहे.
या नोटीसनुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची थकबाकी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 कोटी 6 लाख, 76 हजार रुपयांची थकबाकी भरणे आवश्यक आहे. दोन दिवसांत 22 कोटींची थकबाकी न भरसल्या पुढील कारवाई करण्याची नोटीसमध्ये नमूद आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम 42 मध्ये तरतुदीनुसार रुग्णालयावर कारवाई करण्याचे महापालिकाचे तोंडी आदेश आहेत.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाने मागील सहा वर्षांपासून 27 कोटी 68 लाख 62 हजार 874 रुपये इतका मिळकतकर थकवल्याचं समोर आलं होतं. रुग्णालयाने आतापर्यंत 15 कोटी रुपये भरले आहेत. 2019-20 ते 2024-25 या आर्थिक वर्षात रुग्णालयाने मिळकत कराचा एक रुपया देखील भरला नसल्याने त्यांच्याकडे 22 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय असल्याने रुग्णालयाचा मिळकत कर माफ करावा अशी मागणी करत रुग्णालयाने न्यायालयात केस दाखल केली आहे. 2017 पासून केस न्यायप्रविष्ठ आहे. याचाच उल्लेख काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर धनंजय केळकर यांनी देखील केला होता.
तर, सामान्य पुणेकरांचे 50 हजार रुपये थकल्यानंतर सुद्धा घरासमोर बँड वाजवणारी महापालिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर इतकी मेहरबान का? असा प्रश्न सामान्य पुणेकरांनी विचारल्यानंतर आता महापालिका प्रशासनाला जाग आली आहे आणि त्यानंतर आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महापालिकेचा मिळकत कर विभागाने नोटीस पाठवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.