आगामी महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेसाठी प्रभाग चार सदस्यांचा असणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २०१७ ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवली आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक नगरपालिकांच्या हद्दी वाढविण्यात आल्या आहेत आणि काहींमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली होती, परंतु आता एकसमानता आणण्यासाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत स्वीकारण्यात आली आहे. राज्य सरकारने २०१७ प्रमाणे चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार नगरपालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात ४२ प्रभाग आणि १६६ नगरसेवक असतील असे यापूर्वी चर्चा होती. पण पूर्णकांकातील आकडा पकडला जाणार नसल्याने नगरसेवकाची संख्या एकने कमी होणार आहे. पुणे शहरात ३० लाख लोकसंख्येसाठी १६१ नगरसेवक आहेत. त्यापुढील प्रत्येक लाखासाठी एक नगरसेवक असणार आहे. २०११नुसार पुणे शहराची लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार ९०० एवढी आहे. त्यामुळे ३४ लाखासाठी १६५ नगरसेवक असतील. प्रभागांची संख्या ४२ राहणार आहे.
राज्य सरकारच्या आदेशानंतर आता महापालिकेतर्फे प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवली जाणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर त्यावर हरकती व सूचनांवर मागवून सुनावणी होणार आहे.
सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवली जाणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. प्रभाग रचनेची सुरुवात उत्तर दिशेकडून सुरु होणार आहे, तर दक्षिण भागात सर्वात शेवटचा प्रभाग असेल.
मुंबई महापालिका राज्यातील इतर सर्व महापालिकांची निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे.
प्रभाग रचना करताना २०११ची जनगणना आधा पकडून प्रभाग तयार होतील.
प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार यांचा समावेश असेल.
एकाच इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये करू नये, मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजे.सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्वे नंबर यांचे उल्लेख करावा, प्रभागातील वस्त्याांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी, प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेउन निश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.