MNS party office witnesses heavy crowd as aspirants submit nomination applications amid growing speculation of a Thackeray brothers alliance in upcoming municipal elections. Sarkarnama
पुणे

Pune Politics : भाजपनंतर पुण्यातील इच्छुकांची राष्ट्रवादी, शिवसेना नव्हे तर मनसेला पसंती! पहिल्याच दिवशी वाटले 'इतके' अर्ज

Pune Municipal Election 2025 : भाजपकडे तब्बल 2300 अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. काँग्रेसकडून देखील 211 अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तब्बल 260 अर्जांची विक्री करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तब्बल 350 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

Sudesh Mitkar

Pune News, 13 Dec : आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केले आहे. गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या निवडणूक आता होत असल्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये रेकॉर्ड ब्रेक इच्छुकांचे अर्ज पक्षांकडे दाखल होत आहेत.

165 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये भाजपकडे 2300 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भाजपा पाठोपाठ मनसेचा अर्ज वाटपाचा इंजिन देखील सुसाट धावताना पाहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

मात्र आत्तापर्यंत पुणे महापालिकेबाबत मनसे आणि ठाकरे सेनेच्या युती संदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट झाली नव्हती आता दोन्ही पक्षातील नेत्यांनी चाय पे चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे पदाधिकारी अनौपचारिक चर्चांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. ही भेट म्हणजे एक प्रकारे मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीचं पहिलं पाऊल असल्याचं बोललं जात आहे.

अशातच मनसेकडून शुक्रवारी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडे अर्ज घेण्यासाठी झुंबड उडाली असल्याचं पाहायला मिळालं. पहिल्याच दिवशी शुक्रवारी 409 जणांनी मनसेचे उमेदवारी अर्ज घेतले आहेत. आज देखील उमेदवारी अर्ज वाटप केले जाणार आहेत. आतापर्यंत सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज हे भाजपकडे प्राप्त झाले आहेत.

भाजपकडे तब्बल 2300 अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. काँग्रेसकडून देखील 211 अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तब्बल 260 अर्जांची विक्री करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तब्बल 350 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ठाकरेंच्या सेनेकडे देखील तब्बल 250 इच्छुक असल्याचे समोर आला आहे.

मात्र इतर पक्षांच्या तुलनेत भाजप नंतर मनसेचा इंजिन सुसाट धावल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि शिवसेना आणि मनसे एकत्रित युती करून महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार या पार्श्वभूमीवर मनसेच्या इच्छुकांमध्ये उत्साह असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT