bjp, shiv sena  sarkarnama
पुणे

Shiv Sena BJP Alliance : पुण्यात भाजपकडून 'युतीचं गाजर'; शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीमागं लागला 'चकवा' : भरलेले अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढावणार?

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचा निर्णय रखडल्याने एबी फॉर्म घेऊन अर्ज भरलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (ता.30) संपली संपली. युतीबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे शिवसेनेच्या जवळपास 161 कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र अर्ज भरण्याची मुदत संपण्यास दोन तासांचा कालावधी शिल्लक असताना पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा ‘युतीचे गाजर’ दाखविल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही उमेदवारी कायम राहील की नाही, अशी धाकधूक मनात असल्याची शंका अनेकांनी बोलून लागली. राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना हा प्रमुख घटक पक्ष आहे. महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढणार असल्याचे यापूर्वीच दोन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु जागा वाटपात भाजपने शिवसेनाला विश्‍वासात न घेता केवळ पंधरा जागांचा प्रस्ताव दिला. त्यास नकार देत आणखी जागा वाढून मिळतील, अशी अशा पक्षाला होती.

परंतु पक्षाचे स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची कचखाऊ भूमिकेमुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या वेळेपर्यंत त्यावर निर्णय होऊ शकला नाही. तर अन्य पर्याय म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही पक्षाकडून चाचपणी करण्यात आल्यानंतर तेथेही नकार मिळाला. त्यामुळे स्वबळाचा निर्णय घेत पक्षाने आज इच्छुकांना एमबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. असे असताना दुपारी पक्षाचे नेते उदय सामंत पुण्यात आले आणि त्यांनी युती अभेद्य असल्याचे जाहीर केले. माघारीच्या दिवसापर्यंत वेळ आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण झाले आहे.

पक्षातून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 161 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. माघारीपर्यंत भाजप बरोबरच युती झाली तर कोणत्या जागा मिळणार, अन्य ठिकाणी पक्षाकडून जे एबी फॉर्मसह अर्ज भरलेल्या इच्छुकांचे काय होणार, पक्षाने सांगूनही काही इच्छुकांनी माघार घेतली नाही, तर तेथे मैत्रिपूर्ण लढतीला परवानगी देणार का, इच्छुकांना विश्‍वासात न घेता पक्ष आयोगाला पत्र देऊन परस्पर एबी फॉर्म काढून घेणार का अशा शंका कार्यकर्त्यांकडून उपस्थित केल्या जात आहे.

स्थानिक आणि प्रदेश पातळीवर नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने आमची ही अवस्था झाली आहे, अशी तिखट प्रतिक्रियाही एका नेत्यांने नाव न देण्याच्या अटीवर सकाळशी बोलताना केली.

वादावादी वाढली अन् पोलिसांना बोलावले...

शिवसेनेच्‍या पदाधिकाऱ्यांकडून हॉटेलमध्ये उमेदवारीचे ‘एबी’ फॉर्म वाटप सुरू असतानाच वादावादी, घोषणाबाजीचे प्रकार घडल्याने अखेर हॉटेल मालकाला पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. अवघ्या काही तासांत अर्ज भरण्याची मुदत संपणार असल्याने पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड तणाव पाहायला यावेळी मिळाला.

पुण्यात भाजपकडून (BJP) जागावाटपाबाबत कोंडी निर्माण झाल्यामुळे शिंदे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी अस्वस्थ झाले होते. तसेच याच नाराजीतून शिंदे गटातील महत्त्वाचे नेते रवींद्र धंगेकर आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी बैठकीतून अचानक बाहेर पडले.

‘माझं नाव आधी..., आम्हाला डावललं जातंय’...

‘माझं नाव आधी..., आम्हाला डावललं जातंय’... असे शिवसेनेतील (Shivsena) इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक राहिले असताना गलका केल्‍याचे पाहायला मिळाले. फॉर्म मिळत नसल्याचा आरोप करत काही पदाधिकाऱ्यांनी थेट गोंधळ घालण्यास सुरवात केली. उदय सामंत पुण्यात पोहोचण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT