Pune Accident 
पुणे

Navale Bridge Accident: स्पीड गन्स, वेगमर्यादा अन्...; अपघात रोखण्यासाठी कडक उपाय योजना; 'हे' अधिकारी राहणार जबाबदार

Navale Bridge Accident: देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सूचना, आता यंत्रणांवर जबाबदारी निश्चित होणार

Sudesh Mitkar

Navale Bridge Accident: नवले पूल परिसरात अपघात थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे. मात्र, या गोष्टीसाठी वेळ लागणार असल्याने अपघात रोखण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित करण्यात आली आहे. आज या संदर्भात पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्यानंतर काही निर्णय घेण्यात आले आहे.

नवले पूल परिसरात होणारे अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नेमके काय करता येईल? याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार जांभूळवाडी ते वडगाव परिसरात विविध उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची बैठक नेहमीप्रमाणे वेळेवर घेतली जायलाच हवी. सेवा रस्त्यांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडगाव पुलाचे रुंदीकरण त्वरेने हाती घ्यावे, असे ठोस निर्देश मोहोळ यांनी या बैठकीत दिले.

कायमस्वरूपी उपाययोजना

जांभूळवाडी ते वारजे रिंग रोड आणि जांभूळवाडी ते रावेत उन्नत मार्ग हे नवले पूल परिसरातील अपघात कमी करण्यासाठीचे कायमस्वरूपी समाधान आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून जांभूळवाडी ते वारजे रिंग रोडचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असून त्याला अधिक गती देण्यात यावी. उन्नत कॉरिडॉरचा डीपीआर पूर्ण झाला असून, तो लवकरच मंत्रीमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केली जाणार आहे.

जबाबदारी निश्चित

या बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांना त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच, बैठकीच्या इतिवृत्तानुसार प्रत्येक यंत्रणेने केलेल्या कामाचा आढावा डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

'या' उपाययोजना होणार

  1. स्पीड गन्सची संख्या तीनऐवजी सहापर्यंत वाढवावी.

  2. वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० ऐवजी ३० किमी करावी.

  3. रस्त्यावरील रिफ्लेक्टर्सची संख्या वाढवावी.

  4. पीएमपीने अधिकृत बसथांबे उभारावेत.

  5. सर्व यंत्रणांनी आपापल्या हद्दीतील सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित काढून घ्यावीत.

जड वाहनांवर कारवाई होणार

प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून खेड शिवापूर टोलनाक्यावर जड व अवजड वाहनांच्या अतिभार (ओव्हरलोड), ब्रेक आणि इतर तांत्रिक बाबींची कसून तपासणी केली जाईल. नियमभंग करणाऱ्या जड वाहनांवर पुढील टोलनाक्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT