PM Modi: बिहारनंतर टार्गेट पश्चिम बंगाल! पवित्र गंगा नदीचा दाखला देत PM मोदींनी सेट केलं 'नरेटिव्ह'; भाजपच्या कार्यकर्त्यांना लावलं कामाला

PM Modi: बिहारमध्ये स्पष्ट बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवत पुन्हा भाजप्रणित एनडीएचं मजबूत सरकार स्थापन होणार आहे. यामुळं सहाजिकचं भाजपचा उत्साह दुणावला आहे.
PM Narendra Modi and Mamata Banerjee
PM Narendra Modi and Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

PM Modi: बिहारमध्ये स्पष्ट बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवत पुन्हा भाजप्रणित एनडीएचं मजबूत सरकार स्थापन होणार आहे. यामुळं सहाजिकचं भाजपचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमधील विजयानिमित्त दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात केलेल्या संबोधनात काही बाबतीत स्पष्ट संकेत दिले आहेत.

यामध्ये त्यांनी आता आपला मोर्चा हा पश्चिम बंगाल असल्याचं सांगितलं. या ठिकाणी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला शह देऊन तिथेही आता भाजपचा झेंडा रोवणार असल्याचं त्यांनी रुपकाच्या माध्यमातून सांगितलं. यासाठी त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीचा दाखला दिला आहे.

PM Narendra Modi and Mamata Banerjee
Congress Dynasty Politics : 'घराणेशाही'चा बोलबाला! मनपा निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्षांनी पुत्रालाच केले 'प्रभारी'

पंतप्रधान मोदी म्हणाले, "भाजपची ताकद भाजपचा कार्यकर्ता आहे. जेव्हा भाजपचा कर्मठ कार्यकर्ता जर निश्चित करतो तर कोणतंही लक्ष्य त्याच्यासाठी अशक्य राहत नाही. आज भाजपच्या प्रत्येक यशाचा आधार त्यांचा कार्यकर्त्यांच आहे. आजच्या विजायनानं भाजप कार्यकर्त्याला केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही नव्या उर्जेनं भरुन टाकलं आहे. तसंच गंगाजी इथं बिहारमधून वाहत जाऊन बंगालपर्यंत पोहोचते. बिहारनं आता बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा रस्ताही बनवून टाकला आहे. मी बंगालच्या जनतेला अश्वस्त करतो की आता भाजप तुमच्यासोबत पश्चिम बंगालमधून देखील जंगलराज उखडून टाकेल"

PM Narendra Modi and Mamata Banerjee
Bihar Election Result : अजितदादांच्या मनसुब्यांना 'बिहारी' झटका : राष्ट्रवादीला पुन्हा 'राष्ट्रीय' पक्ष करण्याचा प्रयत्न फेल

मोदींनी सेट केलं नरेटिव्ह

दरम्यान, बिहारमधून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाचं जंगलराज आम्ही संपवून टाकलं आहे, असं वारंवार सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारचं कथित जंगलराज उखडून टाकण्याचं स्वप्न तिथल्या जनतेला दाखवलं आहे. मुळात विरोधकांच्या सत्तेला जंगलराज संबोधनं हे भाजपचं नरेटिव्ह असून त्यांनी ते जनतेच्या मनी उतरवण्यात त्यांना यश आलं आहे.

कारण बिहारमध्ये गेल्या वीस वर्षापासून भाजप-नितीश कुमार यांचीच सत्ता आहे. नितीशकुमार यांनी काही काळ इथं पलटूरामची भूमिका बजावली पण भाजपसोबत त्यांनी सत्तेचा उपभोग घेतला आहे. भाजपनं आपलं नरेटिव्ह सेट केलेलं असलं तरी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला मात्र जंगलराजच्या नरेटिव्हला आत्तापर्यंत प्रत्युत्तर देता आलेलं नाही. काँग्रेसनं भाजपच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला, विरोध केला. पण राजदनं याला म्हणावा असा विरोध केला नाही, हाच त्यांचा बिहारच्या निवडणूक प्रचारातला एक कमजोर भाग मानलं जात आहे.

PM Narendra Modi and Mamata Banerjee
Dharashiv Mahayuti : राणा पाटील-प्रताप सरनाईकांनी जुळवून घेतलं; 6 नगराध्यक्षपदांची भाजप-शिवसेनेत वाटणी; दोनसाठी जोरदार रस्सीखेच

ममता बॅनर्जी कसं देणार उत्तर?

आता आपलं हेच नरेटिव्ह भाजप पश्चिम बंगालमध्ये देखील राबवण्यासाठी सज्ज असल्यांच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कालच्या भाषणातून स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुंळं आता या जंगलराजच्या भूमिकेला ममता बॅनर्जी कशा पद्धतीनं उत्तर देतात किंवा भाजपवरच त्यांचं नरेटिव्ह उलटवतात का? हे पाहावं लागणार आहे. कारण जर ममतांना हे जमलं नाही तर कदाचित बिहारसारखी परिस्थती येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळू शकते. त्याच्या जोडीला महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजना आणि बिहारमधल्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजेनेसाराखी एखादी केंद्र सरकारची योजना पश्चिम बंगालमधील महिलांना देखील लागू होऊ शकते. याचा विचारही ममता बॅनर्जी यांना करावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com