Pune News, 30 Nov : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची गट्टी जमेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत चर्चा देखील दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते यासाठी अधिक सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही स्थानिक नेते देखील यासाठी आग्रही आहेत असं बोललं जात आहे.
असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र यापासून फारकत घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करायची नाही, अशीच भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली असून जर आघाडी झाल्यास आपण राजकारणात थांबू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, काही दिवसांपासून दोन राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा विचार करत असेल जेणेकरून तिकडच्या चार लोकांचा आणि आमच्या दोन लोकांचा फायदा होईल.
या संकुचित भावनेतून काही निर्णय झाले तर मी या सर्व प्रोसेसपासून दूर राहून आपलं राजकारण काही दिवसांसाठी थांबेल असा इशारा जगताप यांनी दिला. जगताप यांच्या या भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर हे जगतापांसाठी मैदानात उतरले आहेत.
धंगेकर म्हणाले, प्रशांत जगतापांच्या बाबतीत काही बातम्या माध्यमांमध्ये पहिल्या, अर्थात आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा यांच्या संभाव्य युतीनंतर राजकारणातून विश्रांती घेण्याबाबतीत विचार करत असल्याचे समजते. आता पवारसाहेब आणि अजितदादा काय निर्णय घेतील ते माहिती नाही.
परंतु एक पुणेकर म्हणून अशी अपेक्षा की प्रशांतदादा जगताप यांनी असा निर्णय घेऊ नये. या पुण्यनगरीच्या राजकीय पटलावर जेव्हा जेव्हा काही चुकीचे घडते. तेव्हा तेव्हा आवाज उठविणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे. आपल्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्याने असा निर्णय घेऊ नये. आपल्या हातून या पुण्यनगरीची अजून खूप सेवा बाकी आहे, असं धंगेकर म्हणले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.