Sharad Pawar, Jayant Patil Sarkaranama
पुणे

Devendra Fadnavis : शरद पवारांना भास होतात तर जयंत पाटील मस्करी करतात...; फडणवीसांची टोलेबाजी, नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis On Sharad Pawar And Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य महायुती सरकारवर टीका करत गृहमंत्रालयावर निशाणा साधला. राज्य सरकार या निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांना पोलिसांच्या गाडीतून रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 02 Nov : राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य महायुती सरकारवर टीका करत गृहमंत्रालयावर निशाणा साधला. राज्य सरकार या निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांना पोलिसांच्या गाडीतून रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

पवारांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पुणे (Pune) दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेत्यांची भेट घेत नाराजी दूर करणार असल्याचं बोललं जात आहे.

पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिवाय आपण पुण्यात का आलो आहोत हे देखील त्यांनी सांगितलं. फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या मी पुण्यात भेटी घेणार आहे आणि चर्चा करणार आहे.

तसंच इतर जिल्ह्यातील लोक देखील माझ्या भेटीसाठी पुण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी पुणे हे सोयीचे असल्याने मी पुण्यात आलो आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड यासारख्या जागांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असताना देखील अजित पवारांनी उमेदवार उभे केले आहेत. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, मला अपेक्षा आहे की अजित पवार यांच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज ते मागे घेतील."

शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, "मला लोक असे सांगतात की, त्यांच्या काळामध्ये असं चालायचं. त्यामुळे आता त्यांना तो भास होत असेल कारण आमच्या काळात तरी असं काही चालत नाही." तर जयंत पाटील यांनी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून फडणवीस ब्लॅकमेल करत होते, अशी टीका केली आहे.

त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "जयंत पाटील यांचा चेहरा बघा ते नेहमीच मस्करी करत असतात त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं. त्यांना सिरीयसली घेत जाऊ नका." अशी टोलेबाजी त्यांनी यावळी केली. दरम्यान, गोपाळ शेट्टी यांच्या नाराजीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, "गोपाळ शेट्टी हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. आमची भेट झाली पक्षाची शिस्त त्यांनी नेहमी पाळली आहे. त्यांची कितीही नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा ही विनंती असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT