Mumbai News, 02 Oct : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबात बोलताना, 'या मतदारसंघात इम्पोर्टेड माल नहीं चलेगा, ओरिजनल चलेगा', असं वक्तव्य केलं होतं.
सावंत यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर शायना एन. सी (Shaina NC) यांनी सावंतांनी आपला माल असा उल्लेख केला असून हा महिलांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.
या प्रकरणी खासदार अरविंद सावंत महिलांची माफी मागणी अशी मागणी करत त्यांनी नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. या प्रकरणावर अनेक नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सावंत यांची पाठराखण केली आहे.
शिवाय अरविंद सावंत (Arvind Sawant) एक जबाबदार नेते असून त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकारांनी या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, "या वक्तव्यामुळे कोणताही अपमान झाला नाही. सावंत आमचे एक जबाबदार आणि वयस्कर नेते आहेत.
त्यांनी म्हटलं की, 'भाजपच्या महिला उमेदवार बाहेरून आल्या आहेत, इम्पोर्टेड माल आहेत', तर त्यात महिलांचा अपमान कुठे आहे? तुम्ही सोनिया गांधी प्रियांका गांधींबाबात काय म्हटलं आहे ते जरा आठवा. भाजप राजकीय स्टंट करत आहे. बाहेरचा माल आहे तर बाहेरचा माल आहे, इम्पोर्टेड आहे.
मतदारसंघाच्या बाहेरचं कोणी लढत असेल तर लोक त्यांना बाहेरून आले आहेत, असं म्हणतात. म्हणजे ते स्थानिक नाहीत एवढंच त्यांनी म्हटलं, त्याचा एवढा मोठा इश्शू करण्याची गरज नाही." अशा शब्दात राऊत यांनी सावंत यांची पाठराखण केली आहे.
दरम्यान, भाजपचे नेते पूर्वी सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांना इम्पोर्टेड माल बोलायचे. अरविंद सावंत हे जबाबदार नेत आहेत. मुंबादेवीत आयात केलेल्या नेत्यांबद्दल ते बोलत होते. तेव्हा शायना एनसी बाहेरुन आल्या असून त्यांना विरोध होत आहे, असं सावंत यांच्या बोलण्याचा अर्थ होता. ते बोलण्याच्या ओघात काही बोलले असतील. मात्र, निवडणुकीच्या काळात शायना एनसी यांच्याकडून या गोष्टींचे भांडवल केले जात असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.