CCTV footage visuals from a Pune CNG pump after BJP national spokesperson Shehzad Poonawalla’s mother was allegedly hit by a car; CM Devendra Fadnavis orders inquiry. Sarkarnama
पुणे

Pune News : पुण्यात मोठा अपघात : भाजपच्या राष्ट्रीय नेत्याच्या आईला कारने उडवलं; CM फडणवीसांनीही घेतली दखल

Shehzad Poonawalla Mother Accident Pune : पुण्यात भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईचा मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सीएनजी पेट्रोल पंपावर एका कारने जोरदार धडक दिली. यात आईला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, पण पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली आहे.

कसा होता घटनाक्रम..

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आई सीएनजी पंपावर कारची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी भरधाव जाणाऱ्या एका कारने त्यांना जोराची धडक दिली. यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. एका सीएनजी पंपावर हा सगळा प्रकार रात्रीच्या वेळी घडला आहे.

पोलिसांनी या कार चालकाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी शहजाद पूनावाला यांनी केली होती. कार चालकाने जाणूनबुजून शहजाद पूनावाला यांच्या आईला धक्का मारला असल्याचा आरोप केला जात आहे. शहजाद पूनावाला यांनी आईच्या अपघाताची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

शहजाद पूनावाला यांनी लिहिले, "एका माणसाने माझ्या आईला जाणूनबुजून धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. आरोपी तिला धडक देऊन पळून गेला. माझ्या आईला लवकरच शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. या वयात तिच्यासोबत असे घडणे खूप त्रासदायक आहे. मला आशा आहे की पुणे पोलिस त्या माणसाला अटक करतील आणि त्याला योग्य ती शिक्षा मिळेल."

याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात एक्स वर पोस्ट करण्यात आली असून. ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली आली आहे. याशिवाय शहजाद पूनावाला यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे.

आरोपी लवकरात लवकर पडण्यात येईल, असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर स्वतः पुनावाला यांनी ट्विट करून या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले असल्याची माहिती दिली आहे. कार चालकाने नशेत धडक दिली की आणखी काही याचा तपास पोलीस करतील असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT