Pune Mayor News : CM फडणवीसांनी ‘त्या’ तिघींपैकी मंजुषा नागपुरे यांनाच का केले महापौर? ‘ते’ मुद्दे ठरले टर्निंग पॉईंट...

Pune Mayor Election : पुणे भाजपच्या बैठकीत मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे या तिघींची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याचे ठरले होते.
Manjusha Nagpure, Devendra Fadnavis
Manjusha Nagpure, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Manjusha Nagpure Mayor : पुणे महापालिकेच्या महापौरपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याचा सस्पेन्स अखेर आज संपला. सलग तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे यांना भाजपने संधी दिली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक झाली तरी त्यांची निवड निश्चित आहे. पण अनेक महिला नगरसेवकांची नावे पुढे येत असताना नागपुरे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब का झाले, याबाबत आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

भाजपने १६५ पैकी ११९ जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता काबीज केली आहे. पुण्याचे महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्यानंतर सुरूवातीला अनेक नावांची चर्चा होती. नागपुरे यांच्यासह वर्षा तापकीर, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरदा बापट, निवेदिता एकबोटे, उज्वला जंगले यांची नावे आघाडीवर होती. सोमवारी पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती.

बैठकीत मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे या तिघींची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याचे ठरले. तिघींपैकी एक नाव निश्चित करण्याचे अधिकार फडणवीस यांना देण्यात आले. फडणवीस यांनी आज नागपुरे यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याचे समजते. त्यानुसार आज नागपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Manjusha Nagpure, Devendra Fadnavis
Rohit Pawar News : मोठा ‘फ्रॉड’ करण्यापासून तुम्हाला रोखले! रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सरन्यायाधीश संतापले...

ही आहेत प्रमुख कारणे –

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांच्यासारख्या तरूण नेत्याला संधी देण्यात आली आहे. ते सर्वात तरूण राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहे. या निवडीतून भाजपने तरूणाईला पक्षात संधी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार पुण्यात उच्चशिक्षित असलेल्या मंजुषा नागपुरे यांना संधी दिल्याचे मानले जाते.

नागपुरे या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहेत. २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी मोठा विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली होती. त्यांना महापालिका प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी मागील टर्ममध्ये काम केले आहे.

Manjusha Nagpure, Devendra Fadnavis
Shiv Sena news : एक नगरसेवक असूनही उपमहापौरपद, माजी आमदाराचे पुत्र भडकले; शिंदेसेना अडगळीत जाण्याची भीती...

मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या सिंहगड रस्ता परिसरात भाजपचा वरचष्मा वाढण्यात त्यांचाही मोठा हातभार आहे. सिंहगड रस्ता परिसर आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. या भागाला नागपुरे यांच्या रुपाने पहिल्यांदाच महापौरपद मिळाले आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे मंजुषा नागपुरे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या होत्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही त्या सक्रीय होत्या. त्यांच्यासह त्यांचे पती दीपक नागपुरे हे सक्रिय हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दीपक नागपुरे यांनी विश्व हिंदू परिषदेची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे नागपुरे यांच्या नावाला आरएएसचीही पसंती आहे. आरएसएस आणि भाजपचे नागपुरे यांच्या नावार एकमत झाल्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com