Nilesh Ghaywal passport case Sarkarnama
पुणे

Nilesh Ghaywal : निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर, बनावट पासपोर्टनंतर आता दमदाटी करून दुसऱ्याचं सीम कार्ड घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

Nilesh Ghaywal Crime Case : पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. अशातच आता त्याने केलेला आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. घायवळने जबरदस्तीने एका व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करत त्यांच्या नावावर सिमकार्ड घेतल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासांतून समोर आली आहे.

Jagdish Patil

Pune News, 14 Oct : पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. अशातच आता त्याने केलेला आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे.

घायवळने जबरदस्तीने एका व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करत त्यांच्या नावावर सिमकार्ड घेत वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासांतून समोर आली आहे.

या प्रकरणी संबंधित व्यक्तीच्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलीस ठाण्यात घायवळ विरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश घायवळला सुरूवातीला संबंधित व्यक्तीने कार्ड देण्यास नकार दिला होता.

मात्र, त्यानंतर घायवळने 13 जानेवारी 2020 रोजी रात्री जबरदस्तीने या व्यक्तीला एका ठिकाणी नेत जिवे मारण्याची धमकी दित शिवीगाळ करुन धमकावले. त्यानंतर तक्रारदाराने त्याचे आधारकार्ड वापरून मीळालेले सीमकार्ड घायवळला दिले.

त्या सीमकार्ड आणि मोबाईल नंबरचा उपयोग करुन घायवळने स्वतःच्या नावाने आणि पृथ्वीराज एंटरप्रायजेस आणि समृध्दी एग्रो या कंपन्यांच्या नावावर बँक अकाउंट्स उघडली. त्यानंतर आता मोबाईल दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी घायवळ विरोधात फसवणूक, धमकी देणे असे गुन्हा दाखल केले आहेत.

त्यामुळे आता निलेश घायवळचे विविध कारनामे उघडकीस येत असून इतके दिवस पोलिसांच्या निदर्शनास त्याची गुंडीगिरी कशी आली नाही? असा सवाल सर्वसामान्य पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT