Ravindra Dhangekar On BJP: चंद्रकांतदादा, मोहोळ 'टार्गेट'वर; तरीही धंगेकर म्हणतात,'भाजपच्या 'त्या' गटाचा मला पाठिंबा...'

Ravindra Dhangekar Vs BJP : गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून भाजप विरुद्ध शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर असा राजकीय सामना पुण्याच्या मैदानात रंगला असल्याच पाहायला मिळत आहे.
Ravindra Dhangekar, BJP
Ravindra Dhangekar, BJPSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून भाजप विरुद्ध शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर असा राजकीय सामना पुण्याच्या मैदानात रंगला असल्याच पाहायला मिळत आहे. एकीकडे धंगेकर यांच्याकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपमधील पदाधिकाऱ्यांकडून देखील धंगेकरांबाबतचे फोटो व्हायरल करत काही सवाल विचारण्यात येत आहेत.

एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन पक्षच आमने-सामने ठाकले असून आरोप प्रत्यारोपांची राळ उडताना पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमध्ये असताना भाजपमधून त्यांना प्रखर असा विरोध होता. ते आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये आले आहेत. मात्र, अद्यापही भाजपचा विरोध काही मावळल्याचं पाहायला मिळालेलं नाही.

अशातच कोथरूडमधील गुन्हेगारीच्या प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना डिवचल असल्याने भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या विरुद्ध अधिक आक्रमक झाले आहेत. असं असताना देखील रवींद्र धंगेकर यांनी भाजपमधील एका गटाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या या दाव्यामुळे नेमकं हा गट कोणता अशा चर्चांना उधाण आला आहे. धंगेकर हे मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत टीका करत आहे. त्यांनी घेतलेली ही भूमिका नेमक्या कोणत्या गटासाठी फायदेशीर आहे. नेमक्या कोणत्या राजकीय फायद्यासाठी भाजपचा एक गट रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देत आहे. अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत.

Ravindra Dhangekar, BJP
Vishal Patil News: आरक्षण जाहीर होताच खासदारांच्या सौभाग्यवती दौऱ्यावर, सांगलीत पूजा पाटलांनी मतदारसंघ पिंजून काढला

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजपमधील एक गट आपल्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, पुण्याच्या गुन्हेगारी वर मी बोलत असताना भाजपामधील काहीजण माझ्यावर बोलत आहेत. त्यांच्या पक्षामध्ये ते नेत्यांचे लांगूलचालन करत आहेत. आपल्या नेत्याला मी किती तुमच्या बाजूने बोलत आहे. हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, यावर भाजपचे बहुतांशजण याबाबत काही बोलत नाहीत त्यांचा मला पाठिंबा असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणाले.

भाजपमधील प्रामाणिक आणि स्वाभिमानी गट मला मदत करत आहे. त्या गटाला वाटत आहे की ,धंगेकर यांची भाषा ही जनतेची भाषा आहे. भाजपमधील बहुतांश लोकांना वाटत आहे की, धंगेकर आपली भाषा बोलत आहेत. मात्र, त्यांना पक्षांमध्ये ते उघडपणे बोलता येत नाही.

Ravindra Dhangekar, BJP
Sharad Pawar News: शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत 'हा' सर्वात मोठा निर्णय; 'स्थानिक'चा गेम फिरवणार ?

पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढू नये असं वाटणारी देखील भाजपची लोकं आहेत. जी माझ्यासोबत आहेत. असे अनेकजण आहेत. त्यांना पुण्याच्या गुन्हेगारीबाबत मी मांडत असलेली भूमिका पटत आहे आणि ती रास्त वाटत आहे. त्यांचा मला पाठिंबा आहे, असं धंगेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com