Pune News : पुण्यातील पासपोर्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी एका 'ईमेल'द्वारे देण्यात आली. या धमकीनंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने बॉम्ब स्कॉड पाचरण करून या पासपोर्ट कार्यालयाचा शोध घेतला. मात्र त्यानंतर एक वेगळीच माहिती समोर आली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला एक ईमेलद्वारे प्राप्त झाला. त्या ईमेल मध्ये हे पासपोर्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
या ईमेलमध्ये 2 व्यक्तींची नावे नमूद करून त्यांना दुपारी 1 वाजण्याच्या पूर्वी कामावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. तसे न केल्यास कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणला जाईल, असा इशारा दिला होता. मात्र, ईमेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या नावाच्या व्यक्ती पासपोर्ट कार्यालयातील काम करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या ईमेल मध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता. खलिस्तान, कश्मीर, आतंकवाद या सगळ्याच मुद्द्यांबाबत या ईमेलमध्ये घेण्यात आलं होतं. मात्र दिलेल्या गोष्टी अवास्तव आणि अस्तव्यस्त असल्याचं सांगितलं जात आहे. ई-मेल मधल्या कुठल्याच गोष्टीचा नीट संदर्भ लागत नसल्याबाबत देखील पोलिसांनी सांगितले.
धमकीचा ईमेल मिळताच पासपोर्ट कार्यालयाने पोलिसांना तात्काळ माहिती दिली. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा करून इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर कार्यालय परिसरात कोणतीही संशयास्पद अथवा बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही.
पोलिसांनी सांगितले की, परिस्थिती पूर्णपणे ताब्यात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर कार्यालयातील सर्व कामकाज पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ईमेल पाठवणाऱ्याचा मूळ स्रोत शोधणे आणि त्याची ओळख पटवणे यासाठी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून अशा प्रकारच्या अफवा किंवा धमक्या पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.