Sunetra Pawar New Responsibility : फडणवीस सरकारमध्ये सुनेत्रा पवारांना आणखी एक मानाचे स्थान : अजितदादांच्या जागी प्रमुख समितीमध्ये एन्ट्री

Maharashtra Government: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! फडणवीस सरकारमध्ये सुनेत्रा पवारांना प्रमुख समितीत स्थान देण्यात आले असून त्या अजित पवारांच्या जागी नियुक्त झाल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर बातमी.
DCM Sunetra Pawar
DCM Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

राज्यातील फडणवीस सरकारमध्ये सुनेत्रा पवार यांना आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या पुनर्रचनेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आता सुनेत्रा पवार यांना या महत्त्वाच्या समितीत स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याआधी या समितीत अजित पवार यांचा समावेश होता. त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार १० मार्च २०२५ रोजी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची फेररचना करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार आता या समितीची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सदस्य म्हणून कार्यरत राहतील, तर सुनेत्रा पवार यांची सदस्य म्हणून नव्याने एन्ट्री झाली आहे. याशिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे.

DCM Sunetra Pawar
Manoj Jarange Patil : हैदराबाद गॅझेट लागू होऊनही कुणबी प्रमाणपत्राचा तिढा सुटेना; जरांगे पाटलांचा पुन्हा उपोषणाचा इशारा! सरकारचं टेन्शन वाढणार?

या समितीचे सचिव म्हणून राज्याचे मुख्य सचिव काम पाहतील. समितीसमोर मांडण्यात येणारे सर्व प्रस्ताव मुख्य सचिवांमार्फत सादर केले जातील. बैठकीत चर्चेला येणाऱ्या विषयानुसार संबंधित विभागाचे मंत्रीही निमंत्रित केले जाणार आहेत. यामुळे विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यास मदत होणार आहे.

नियोजन, वित्त तसेच विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी समितीचे स्थायी निमंत्रित सदस्य असतील. आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांनाही बैठकीसाठी बोलावले जाईल. समितीसमोर सादर होणारे प्रस्ताव नियोजन विभागाने निश्चित केलेल्या नियमांनुसार तपासूनच पुढे पाठवले जातील.

DCM Sunetra Pawar
BJP Rajya Sabha Candidates : महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री राज्यसभेवर जाणार! भाजपच्या राहिलेल्या 3 जागांसाठी तावडेंसह दानवे, मुंडे, पाटील यांची नावे चर्चेत

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती ही राज्यातील मोठ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि पायाभूत सुविधा विकासासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे या समितीत सुनेत्रा पवार यांचा समावेश हा त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाचा संकेत मानला जात आहे. या बदलामुळे प्रशासनात आणि राजकारणात पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com