Election posters and candidates campaigning in Pune as several high-profile leaders lock horns in tightly contested wards during the Pune Municipal Corporation elections. Sarkarnama
पुणे

PMC Election : पुण्यात 14 जागांवर श्वास रोखायला लावणाऱ्या लढती : बिडकर, जगताप, धंगेकर, बालवडकर, चांदेरे ते बहिरट यांची पायला भिंगरी

Pune Municipal Election News : पुणे महापालिका निवडणुकीत 14 प्रभागांत तुल्यबळ, बहुरंगी आणि बंडखोरीमुळे श्वास रोखून धरायला लावणाऱ्या लढती रंगल्या असून दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ब्रिजमोहन पाटील

Pune PMC Election : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक प्रभागात चौरंगी, पंचरंगी निवडणूक होत आहे. काही ठिकाणी दोन माजी नगरसेवक एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. तर काही ठिकाणी बंडखोरी करून अन्य पक्षात गेलेल्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे 14 जागांवरील तुल्यबळ उमेदवारांमधील लढतीचा थरार यावेळी अनुभवता येणार आहे. या उमेदवारांकडून मतदारांवर आपल्या बाजूने वळवून विजय कसा मिळवतात याकडे लक्ष लागले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 41 प्रभागात 165 जागांवर 1 हजार 165 उमेदवार उभे आहेत. यावर्षीच्या निवडणुकीत बंडखोरीचे झाली आहेच,पण युती आणि आघाडीमध्ये जागा वाटप फिसकटल्याने एबी फॉर्म वाटपाचा गोंधळ सुरु झाला आहे. अनेक प्रभागात युती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे असल्याने नाइलाजास्तव त्यास मैत्रीपूर्ण लढतीचे स्वरूप द्यावे लागले आहे.

निवडणुकीच्या रिंगणात पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत. यामध्ये भाजपचे गणेश बिडकर आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे. 2017 च्या निवडणुकीत दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे होते. यात बिडकरांचा पराभव झाला होता. आता यावेळी गणेश बिडकर यांच्यासमोर धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव उभे आहेत. भाजपमधून बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अमोल बालवडकर यांनी भाजपच्या लहू बालवडकर यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या समोर भाजपचे गणेश कळमकर उभे आहेत.

शिवाजीनगर भागातील पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपच्या रेश्मा भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात पुन्हा एकदा लढत होत आहे. 2017 च्या निवडणुकीत भोसले यांनी बहिरट यांचा पराभव केला होता. तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या विरोधात भाजपच्या डॉ. निवेदिता एकबोटे निवडणूक लढवत आहेत. सहकारनगर भागात सहा वेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आबा बागूल यांच्या विरोधात भाजपचे महेश वाबळे यांचे आव्हान आहे, याच ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांना भाजपच्या वीणा घोष यांनी आव्हान दिले आहे.

पुण्यातील सर्वात मोठा प्रभाग 38 मध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रेय धनकवडे विरुद्ध भाजपचे संदीप बेलदरे यांच्यात लढत होत आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रकाश कदम विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे या दोन माजी नगरसेवकांत थेट लढत आहे. कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी भागात भाजपच्या रंजना टिळेकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर बधे यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये अभिजित शिवरकर यांच्यातील लढतीकडे लक्ष लागले आहे.

  • 1 - प्रभाग 5- (कल्याणीनगर - वडगाव शेरी) - नारायण गलांडे (भाजप) विरुद्ध सचिन भगत (राष्ट्रवादी)

  • 2 - प्रभाग 7 - (गोखलेनगर- वाकडेवाडी) - रेश्मा भोसले (भाजप) विरुद्ध दत्ता बहिरट (राष्ट्रवादी)

  • 3 - प्रभाग 8 - (औंध, बोपोडी) - सनी निम्हण (भाजप) विरुद्ध प्रकाश ढोरे (राष्ट्रवादी)

  • 4 - प्रभाग 9 - (सूस, बाणेर, पाषाण) - गणेश कळमकर (भाजप) विरुद्ध बाबूराव चांदेरे (राष्ट्रवादी)

  • 5 - प्रभाग 9 - (सूस, बाणेर, पाषाण) - लहू बालवडकर (भाजप) विरुद्ध अमोल बालवडकर (राष्ट्रवादी)

  • 6 - प्रभाग 12 - (शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी) - निवेदिता एकबोटे (भाजप) विरुद्ध बाळासाहेब बोडके (राष्ट्रवादी)

  • 7 - प्रभाग 14 (कोरेगाव पार्क, मुंढवा) - उमेश गायकवाड (भाजप) विरुद्ध सुनील ऊर्फ बंडू गायकवाड (राष्ट्रवादी) विरुद्ध बाबू वागस्कर (मनसे)

  • 8 प्रभाग क्रमांक 18 (वानवडी-साळुंखेविहार) प्रशांत जगताप (काँग्रेस विरुद्ध अभिजित शिवरकर (भाजप)

  • 9 - प्रभाग 24 (कसबा, कमला नेहरू रुग्णालय) - गणेश बिडकर

  • (भाजप) विरुद्ध प्रणव धंगेकर (शिवसेना)

  • 10 - प्रभाग 36 (सहकारनगर, पद्मावती) - सुभाष जगताप (राष्ट्रवादी) विरुद्ध वीणा गणेश घोष (भाजप)

  • 11 - प्रभाग 36 (सहकारनगर, पद्मावती) - महेश वाबळे (भाजप) विरुद्ध आबा बागूल (शिवसेना)

  • 12 -प्रभाग 38 (बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज) - दत्तात्रेय धनकवडे (राष्ट्रवादी) विरुद्ध संदीप बेलदरे (भाजप)

  • 13 - प्रभाग 38 (बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज) - प्रकाश कदम (राष्ट्रवादी) विरुद्ध वसंत मोरे (शिवसेना - ठाकरे सेना) - विरुद्ध स्वराज बाबर (शिवसेना) - व्यंकोजी खोपडे (भाजप)

  • 14 - प्रभाग 40 (कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी) - रंजना टिळेकर (भाजप) विरुद्ध गंगाधर बधे (राष्ट्रवादी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT