Gagiya Marne sarkarnama
पुणे

गुंड गज्या मारणे विरोधात पुणे पोलिसांनी फास आवळला; १४ जणांविरुद्ध 'मोक्का'

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात आतापर्यंत 101 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune Crime News : शेअर दलाल व व्यावसायिक व्यक्तीचे २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण करण्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या उर्फ गजानन मारणे याच्यासह १४ जणांविरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुण्याचे पोलिस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी मंगळवारी याबाबत आदेश दिले आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात आतापर्यंत 101 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.

गजानन पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, पलूस,), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली,) रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार), नवघणे यांच्यासह साथीदारांविरुद्ध मोक्का अंतरगत कारवाई करण्यात आली आहे.

भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सोमवारी 4 जणांना अटक केली. त्यानंतर गज्या मारणे आणि साथीदार पसार झाले होते. दरम्यान, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी मारणेसह त्यांच्या साथीदारांच्या विरोधात 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास पोलिस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर हे करत आहेत.

दरम्यान, खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेने साथीदारांसह नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून कोथरुडपर्यंत रॅली काढली होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मारणेने रॅली कढली होती. या प्रकरणी मारणे याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पहिला गुन्हा दाखल झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT