Ambadas Danve and Devendra Fadanis
Ambadas Danve and Devendra FadanisSarkarnama

मुख्यमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्रिपदावर कसे आले, हे फडणवीसांनी आधी बघावे..

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या भाष्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला.

अकोला : शिवसेनेचे (Shivsena) चिन्हं व नाव गोठवल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या भाष्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेनेचे (Shivsena) आमदार अंबादास दानवे यांनी सोमवारी प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला. आम्ही काय गमावले हे बघण्यापूर्वी तुम्ही काय-काय गमावले ते आधी बघा, असे ते म्हणाले.

सोमवारी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने (Amruth Fadanvis) केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर कसे आलेत, ते बघावे व नंतर आम्ही काय गमावले, याबाबत बोलावे, असा सल्ला दिला. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे आणखी काय-काय होणार ते बघा..

मुख्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्‍याच्या वृत्तावर बोलताना दानवे यांनी सत्तारांवर निशाणा साधत पुढे आणखी काय-काय होईल, हे पाहतच रहा, असे सांगितले. त्यांनी फडणवीस सरकार हे शेतकरी, सामन्यांचे नसून, धनदांडग्यांचे असल्याची टिका केली. सरकार म्हणजे बोलाचा भात अन् बोलाचीच कढी असल्याचे ते म्हणाले.

शालेय पोषण आहार योजना वर्षभर बंद..

गेल्या वर्षभरापासून अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजना बंद असल्याची धक्कादायक माहिती अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत समोर आली आहे. एकप्रकारे या योजनेकडे जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, पीक विमा मदत, शेतकऱ्यांना स्वस्त धान्य राशन योजना, कुपोषित बालक व शालेय पोषण आहार तसेच जिल्ह्यातील समस्यांबाबत दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

लहान मुलांच्या हक्काची असलेल्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना न देऊन एकप्रकारे त्यांच्या भवितव्य व भविष्याशी खेळ करत आहात, असे म्हणत दानवे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकारावरून अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे ते म्हणाले. यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय गळतीचे प्रमाण वाढेल, अशी भीतीही दानवे यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, तहसीलदार सुनील पाटील, अकोला ग्रामीणचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी राहुल कराळे, एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकर, शहरप्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर तसेच सर्व संबंधित विभागाचे मुख्य अधिकारी व शिवसेनेचे पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Ambadas Danve and Devendra Fadanis
Shivsena : अंबादास दानवे म्हणाले, हो भुमरे नमकहरामच..

भुकेने मृत्यू ही दुर्दैवी बाब..

राज्यात कोणाची सत्ता असली तरी कुपोषण हा विषय कायम आहे. प्रगतिशील महाराष्ट्रात भुकेने मृत्यू होणे ही दुर्दैवी गोष्ट असल्याची खंत दानवे व्यक्त केली. याविरोधात आवाज उठवून हा प्रश्न मांडणार असल्याचं ते म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार हे धनदांडग्यांचे सरकार..

शेतकऱ्यांना मदतीसाठी कोट्यवधी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकार करते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही मदत पोहोचत नाही. शिंदे फडणवीस सरकार हे धनदांडग्याचे सरकार व गुजरातला मदत करणारे सरकार असल्याचा आरोप दानवे यांनी केला. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या योजना बंद करून जनतेचा विकास खुंटवण्याचं काम करत असून हे स्थगिती सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com