Pune Hit And Rune Case Sarkarnama
पुणे

Hit And Rune Case : 'होय, पोलिस ठाण्यात पिझ्झा नेला, पण कोणासाठी?'; प्रत्यक्षदर्शी शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Sunil Balasaheb Dhumal

Pune Police News : पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कारच्या आपघातील आरोपींना पोलिसांकडून सहानुभूतीपूर्वक वागवणूक मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यावरून पुणे पोलिसांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. आता या आरोपांना प्रत्यक्षदर्शी शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. Hit And Rune Case

कल्याणीनगर येथे रविवारी झालेल्या आपघाताबाबत योग्य ती कार्यवाही होण्यासाठी शिंदे गटाकडून सर्वात प्रथम येरवडा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या परिसरात उभे असलेल्या शिंदे गटाचे पुणे शहराचे समन्वयक शंकर संगम यांनी एका खासगी वृत्तवाहिनाला सर्व काही सांगितले. यावेळी त्यांनी आरोपींसाठी पोलिस पिझ्झा घेऊन आल्याचा दावा केला आहे.

शंकर संगम म्हणाले, अपघातानंतर सोमवारी दुपारी एक वाजता येरवडा पोलिस Pune Police ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे शिष्टमंडळ गेले होते. तेथे आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निवेदन दिले. पोलिस ठाण्याबाहेर उभे असताना पोलिसाने निळ्या बॉक्समधून पिझ्झा आत नेला होता. हा पिझ्झा त्या आरोपींसाठी आणल्याची शक्यता आहे. त्याची खात्री करण्यासाठी त्यावेळेचे म्हणजेच 1 ते 3 वाजेदरम्यानचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करवी, असेही आवाहन संगम यांनी केले.

दरम्यान, रविवारी पाहटेच्या सुमारास अपघात घडला. त्या प्रकरणी सोमवारी सकाळी आठ वाजता गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर नऊच्या सुमारास आरोपी मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी झाल्यानंतर पु्न्हा येरवडा पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पिझ्झा दिल्याचा आरोप होत आहे. Pune Accident News

यावर संगम म्हणाले, आरोपींना पोलिस ठाण्यात आणताना आम्ही पाहिले. त्यात आरोपीसह चालकही होता. त्यानंतर पोलिस ठाण्यात पिझ्झा नेतानाही आम्ही सर्वांनी पाहिले. त्यावेळी आंदोलन केल्यानंतर ताब्यात घेऊन आम्हाला बसवून ठेवता. आता तुम्ही आरोपींना पिझ्झा आणता, आम्हाला मात्र साधे पाणीही विचारत नाहीत, अशी तक्रारही पोलिसांकडे केली. त्यावर पोलिसांनी पाण्याची बाटली आणून दिली. मात्र पिझ्झावर ते काही बोलले नाहीत, असेही संगम यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यातील हिट अॅन्ड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीसह त्याचे वडील आणि आजोबा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलिसांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातानंतर आरोपी मुलाला काही तासांतच जामीन मिळाल्याने हे प्रकरण देशभर चांगलेच गाजले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT