Pune Police Raid  Sarkarnama
पुणे

Pune Crime: माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाचा 'प्रताप'; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Police On Action Mode : एनआयबीएम रस्त्याच्या परिसरात असलेल्या "द व्हिलेज' या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का दिला जात असल्याची खबर कोंढवा पोलिसांच्या पथकास मिळाली

पांडुरंग सरोदे

Pune News : कोंढवा परिसरातील "द व्हिलेज' या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का दिला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिसांच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एनआयबीएम रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी (Pune Police) शुक्रवारी छापा घातला. संबंधित हुक्का पार्लर हा माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाचा असून त्यांच्या मुलासह 5 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाकीर रमेश बागवे ( वय 36, रा. लोहियानगर, भवानी पेठ), हरून नबी शेख ( वय 25), बिक्रम साधन शेख ( वय 25), अमानत अन्वर मंडल ( वय 22) आणि अमानत अन्वर ( वय 24, सर्व रा. प. बंगाल ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. त्यांच्याविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाकीर बागवे हा संबंधित हॉटेलचा चालक असून अन्य चौघे तेथील कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून 23 हजार 500 रुपये किमतीचे तंबाखूजन्य हुक्‍क्‍याचे प्लेव्हर्स आणि काचेचे नऊ हुक्का पॉट जप्त करण्यात आले आहेत. बाकीर बागवे हा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे(Ramesh Bagwe) यांचा मुलगा आहे.

एनआयबीएम रस्त्याच्या परिसरात असलेल्या "द व्हिलेज' या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का दिला जात असल्याची खबर कोंढवा पोलिसांच्या पथकास मिळाली. त्यानुसार, माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक ( गुन्हे) मानसिंग पाटील व त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री संबंधित हॉटेलवर छापा टाकला.

तेथे बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू असल्याचे उघडकीस आले. यावेळी पोलिसांनी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. या कारवाईपाठोपाठ पुण्यातील अन्य काही हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT