Solapur Bazar Samiti : राजेंद्र राऊतांनी बाजी मारली; दोन देशमुख कधी करून दाखवणार?

Vijaykumar Deshmukh Vs Subhash Deshmukh : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मुलासह मर्जीतील भाजप कार्यकर्त्यांची अशासकीय प्रशासक मंडळ म्हणून नियुक्ती करावी, असे पत्र राज्याच्या पणन संचालकांना पाठविले होते.
Vijaykumar Deshmukh-Subhash Deshmukh
Vijaykumar Deshmukh-Subhash DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 August : अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपल्या मर्जीतील अशासकीय प्रशासकीय मंडळ आणून बाजी मारली आहे. मात्र, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाच्या माध्यमातून सत्ता आणण्यात भाजपमधील मातब्बर नेत्यांना अजूनही यश आलेले नाही, त्यामुळे सोलापूर बाजार समितीचे प्रशासकीय मंडळ नेमके कुठे अडकले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) संचालक मंडळाची अंतिम मुदतवाढ 14 जुलै 2024 रोजी संपली. त्याला आज जवळपास दीड महिना उलटून केला आहे, त्यानंतरही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीसाठी कोणत्याही हालचाली होतान दिसत नाहीत.

बार्शी बाजार समितीवर आमदार राजेंद्र राऊत यांनी आपले बंधू विजय राऊत यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करून घेतली आहे. त्यांच्या जोडीला मर्जीतील दोन कार्यकर्त्यांची आमदार राऊत यांनी नियुक्ती केली आहे, त्यामुळे राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी अशासकीय प्रशासक मंडळाच्या माध्यमातून बाजार समितीवर पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळविले. दुसरीकडे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला अजूनही अशासकीय प्रशासक मंडळाची प्रतीक्षा आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मुलासह मर्जीतील भाजप कार्यकर्त्यांची अशासकीय प्रशासक मंडळ म्हणून नियुक्ती करावी, असे पत्र राज्याच्या पणन संचालकांना पाठविले होते. मात्र, ती यादी फुटली आणि त्याला मंजुरी मिळण्याच्या अगोदरच ती नियुक्ती राजकीय वादात अडकली. त्या यादीत केवळ देशमुख समर्थकांचा समावेश होता, त्यामुळे दुसरा गटाकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला.

Vijaykumar Deshmukh-Subhash Deshmukh
Babanrao Shinde : राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; माढ्यात मुलाला संधी देणार

दरम्यान, देशमुख यांनी अशासकीय प्रशासक मंडळाच्या यादीत केवळ आपल्याच कार्यकर्त्यांचा नावे पाठवली होती, त्यामुळे आपल्याही कार्यकर्त्यांचा समावेश व्हावा, अशासकीय प्रशासक मंडळात व्हावा, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू केले. दोन्ही गटाकडून प्रत्येकी दोन नावे अशासकीय प्रशासक मंडळासाठी देण्यात आली होती

शिवसेनेने दोघांची नियुक्ती झाल्याचा अव्वर सचिवांचा आदेशही पारित केला आहे. मात्र, त्याला राज्याच्या पणन संचालकांनी अजूनही मान्यता दिलेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळात शिवसेनेच्या दोघांची नियुक्ती होऊन पदभार घेता आलेला नाही. पण, संचालकाच्या आदेशानंतरच त्यांना बाजार समितीच्या कामकाजात सहभाग घेता येणार आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रशासकीय निवडीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. भाजपमधील गटबाजीचा या नियुक्तीला फटका बसल्याचे मानले जात आहे. दोन देशमुख आणि दक्षिण सोलापूरमधील काही गावे अक्कलकोटला जोडल्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचाही प्रशासकीय मंडळात आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी आटापिटा सुरू आहे. सोलापूर बाजार समितीचा कारभार सध्या प्रशासकाच्या हाती आहे.

Vijaykumar Deshmukh-Subhash Deshmukh
Barshi Bazar Samiti : राजेंद्र राऊतांचा सेना-राष्ट्रवादीला छोबीपछाड; भावाच्या हाती सत्ता देत बार्शी बाजार समिती एकहाती राखली

दोन देशमुखांपेक्षा राजेंद्र राऊत यांनी ताकद लावून बार्शी बाजार समितीवर शासकीय प्रशासक मंडळाच्या माध्यमातून आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित केली आहे. मात्र, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना सोलापूर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ आणता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com