Bheemrao Tapkir-Devendra Fadnavis

 

Sarkarnama 

पुणे

आमदाराच्या प्लाॅटवर गुंडांचा ताबा आणि पोलिस म्हणतात, असे अनेक आमदार पाहिलेत!

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा अनुभव सांगितला.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : असे अनेक आमदार पाहिलेत, असे उत्तर एखादा पोलिस अधिकारी थेट आमदाराला देऊ शकतो? पण असे पुण्यात भाजप आमदारासोबत घडल्याचे आज विधानसभेत स्पष्ट झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज गृहखात्यावर बोलताना खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर (Bheemrao Tapkir) यांचीच फिर्याद पोलिस घेत नव्हते, असा आरोप केला. हे कुठले गुंडाराज आहे, असा सवाल त्यांनी केला.

पोलिस खात्याच्या ढासळत्या प्रतिमेबद्दल बोलताना फडणवीस यांनी भीमराव तापकीर यांच्याबाबतचा अनुभव सांगितला. तापकीर यांच्या निवासस्थानाशेजारील असलेल्या त्यांच्या प्लाॅटवर बेकायदा ताबा मारण्यात आला. तापकीर याबाबत पोलिस तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची दखल घेण्यात आली नाही. उलट असे अनेक आमदार पाहिलेत, असे उत्तर त्यांना देण्यात आले. याबाबत तापकीर यांनी वरिष्ठांकडे दखल घेण्याची विनंती केली. तेथेही त्यांच्या पदरी निराशा आली. शेवटी मला पोलिस आयुक्तांशी बोलावे लागले. तेव्हा तापकीर यांच्यासाठी पोलिस धावून आले, असा किस्सा फडणवीस यांनी सांगितले. एखाद्या आमदाराला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसांचे काय, असे त्यांनी विचारले.

राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे सांगत अमरावती येथील दंगल हा एक प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला. या निमित्ताने `फेक न्यूज`ची फॅक्टरी चालविली गेली. पाकिस्तानातील फोटो हे त्रिपुरातील भासविण्यात आले. एक राष्ट्रीय नेता ट्विट करतो आणि कुठलेही नियोजन नसताना 40 हजार लोक रस्त्यावर येतात. हा संयोग असूच शकत नाही. दंगलीच्या पहिल्या दिवशीची घटना डीलिट आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनेवर कारवाई करण्याचे काम पोलिसांनी केले. जाणीवपूर्वक नाव लिहून भाजप आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली. रझा अकादमीवर कारवाई करणार आहे की नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पोलिस दल सुधारले नाही तर जगातील सर्वोत्तम पोलिस दलाची बदनामी होईल. माझ्याकडे काही गोपनीय माहिती आली तर जनतेच्या हितासाठी मांडणे हे विरोधी पक्षनेता म्हणून माझे काम आहे. पोलिस बदल्यांमध्ये होणाऱ्या रॅकेटचा अहवाल मी फोडला नाही, तर तो केंद्रीय गृह सचिवांना दिला. मविआ नेत्यांनीच तो अहवाल फोडल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांवरील हल्ले आणि अत्याचाराच्या घटना धक्कादायक आहेत. आमच्या महिलांना सुरक्षित वाटणार का? `मनोधैर्य` योजनेतील मदत देखील महिलांना मिळत नाही अशी परिस्थिती असल्याचे फडणवीस यांनी यावेळी मत मांडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT