Pankaj Deshmukh Sarkarnama
पुणे

Pankaj Deshmukh : पुणे ग्रामीण पोलिसांत आता 'देशमुखी थाट'! पंकज देशमुख नवे एसपी

उत्तम कुटे

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य पोलिस दलात वरिष्ठ पातळीवर बुधवारी (ता.३१) मोठा फेरबदल करण्यात आला. या इलेक्शन बदल्यात डीसीपी ते अॅडिशनल डीजीपी लेवलपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक (एसपी) अंकित गोयल यांचा समावेश आहे.

गोयल यांची सव्वा वर्षातच उचलबांगडी करण्यात आली. ते गडचिरोलीचे एसपी असताना पुणे एसपी म्हणून बदलीवर आले होते.आता त्यांची पुन्हा गडचिरोलीलाच मुदतपूर्व बदली झाली आहे. गृहविभागाने त्यांची प्रमोशनवर गडचिरोली रेंजचे डीआयजी (पोलिस उपमहानिरीक्षक) म्हणून बदली केली. त्यांच्या जागी राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) एसपी पंकज देशमुख आले आहेत.

पंकज देशमुखांनी यापूर्वी पुणे शहर पोलिस (Pune Police) दलात डीसीपी म्हणून काम केलेले आहे. पुणे ग्रामीणचे क्षेत्र खूप मोठे असल्याने त्यांच्यापुढे रिझल्ट दाखविण्याचे आव्हान आहे. मात्र, पुण्यात व सीआयडीतही पु्ण्यातच त्यांनी काम केले असल्याने हे आव्हान ते पेलतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आहेत. अशाप्रकारे महसूल आणि पोलिस अशा दोन्ही विभागांचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख हे देशमुख आहेत. त्यातून जिल्ह्यात एकप्रकारे देशमुखीच आली आहे.

परमबीरसिंहानंतर दुसरे आयपीएस मणेरेंनाही क्लिन चिट

रिटायर्ड आयपीएस अधिकारी आणि ठाणे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांच्याबरोबर खंडणी प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेले त्यावेळचे ठाणे शहर पोलिस दलातील डीसीपी पराग मणेरे यांनाही आजच्या बदलीतून मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. आजच सीबीआयने परमबीरसिंहाविरुद्ध क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल करीत त्यांना क्लीन चिट दिली. त्यानंतर मणेरेंनाही लगेच साईड ब्रँचवरुन मोक्याच्या जागी बदलीचे बक्षीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडी सरकारच्या काळात परमबीरसिंह आणि मणेरे या दोघांनाही सस्पेंड करण्यात आले होते. नंतर ही कारवाई युती सरकारने मागे घेतली. मणेरे य़ांचे निलंबन मागे घेत त्यांना व्हीआयपी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग या साईड ब्रँचला डीसीपी म्हणून नियुक्त केले. आता, तर त्यांना पुन्हा ठाण्यातच डीसीपी म्हणून आणून क्लिन चिटच देऊन टाकली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT