Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
पुणे

NCP News: पुण्याच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट; दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची शक्यता मावळली असतानाच शरद पवारांचा बडा नेता अजितदादांना भेटला

NCP Politics: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुक्काम हा पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये होता. तिथेच राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींशी चर्चा, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती ठरवली जात होती. मात्र,शनिवारी सकाळी अजितदादा हे कोणालाही काहीही न सांगता,आपला सगळा ताफा पाठीमागे ठेवत एकटेच बाहेर पडल्याचं दिसून आलं. यामुळे पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरू झाली

Deepak Kulkarni

Pune News: राज्यात महापालिका निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे.युती आणि आघाडीसाठी जोर बैठका सुरू आहे.याचदरम्यान,पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाच्या चर्चांना उधाण आलं होतं.अशातच आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात अजित पवारांच्या नेत्यांसोबत एकतास भर खलबतं झाल्याचंही दिसून आलं होतं.

त्याचवेळी शुक्रवारी झालेल्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटल्यानं संभाव्य युती होणार नसल्याचं समोर आलं होतं. पण आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.त्याचं कारण म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनं उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच सर्वच राजकीय पक्षांकडून बैठका,गाठीभेटी,इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, जागावाटपाच्या चर्चा अशा घडामोडींनी वेग धरला आहे. अशातच आता शनिवारी(ता.27) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंची (Amol Kolhe) गुप्त बैठक झाल्याचं समोर येत आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली याचा अद्याप समोर आला नसला तरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतील दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ती महत्त्वाची मानली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुक्काम हा पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये होता. तिथेच राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींशी चर्चा, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती ठरवली जात होती. मात्र,शनिवारी सकाळी अजितदादा हे कोणालाही काहीही न सांगता,आपला सगळा ताफा पाठीमागे ठेवत एकटेच बाहेर पडल्याचं दिसून आलं. यामुळे पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरू झाली.

अजित पवार हे नेमके कुठे आणि कशासाठी बाहेर पडले? इतक्या गोपनीय पध्दतीनं जाण्याचं नेमकं कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.पण त्यानंतर काही वेळातच अजित पवारांचं वाहन त्यांच्या जिजाई निवासस्थानी पोहोचल्याचं स्पष्ट झालं.याचदरम्यान, शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हेही जिजाई निवासस्थानी दाखल झाल्याचं समोर आलं. त्यानंतर अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात जवळपास अर्धा तास बंद दरवाजामागे चर्चा झाली. या बैठकीनंतर अमोल कोल्हे निवासस्थानातून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडसह इतरही काही महापालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्याचसाठी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात होते. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) युती फिस्कटली असल्याची माहिती समोर येत आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी(ता.26) पार पडली.या बैठकीत घड्याळ की तुतारी या चिन्हांवर तोडगा न निघाल्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य युती जवळपास फिस्कटल्यातच जमा झाली आहे.

अजित पवार हे घड्याळ चिन्हासाठी आग्रही होते.मात्र, शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या उमेदवारांसाठी तुतारी चिन्हावर ठाम असल्याची माहिती आहे.या चिन्हांवरून दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या पक्षाला 35 जागांचा प्रस्ताव देण्यात आला. उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असाही आग्रह करण्यात आला.यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT