vishal agarwal ajay tawre sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident : अजय तावरेचा विशाल अगरवालला सल्ला; रक्त बदलले, तर...

Akshay Sabale

Pune Accident Porsche : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्याचा सल्ला डॉ. अजय तावरे यानेच बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालला दिल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यासह डॉ. तावरे Dr Ajay Taware याला आणखी कोणी संपर्क साधला, याची माहिती समोर आली नाही. तांत्रिक पद्धतीनं विश्लेषण सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

कल्याणीनगर येथे 18मेच्या मध्यरात्री भरघाव आलिशान कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धूम स्टाइलनं कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केल्याचं प्रत्यक्षदर्शीचं मत होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी ( 19 मे ) अल्पवयीन मुलाला 'ससून रूग्णालया'त वैद्यकीय तपासासाठी नेण्यात आलं होतं. पण, याठिकाणी तपासासाठी घेतलेला रक्ताचा नमुना बदलण्यात आल्याचं पोलिस तपासात समोर आलं होतं. यानंतर एकच खळबळ उडाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याप्रकरणी पोलिसांनी 'ससून'चे न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. अजय तावरे ( Ajay Taware ), डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अजय घटकांबळेला अटक केली आली आहे. या तिघांची रवानगी सध्या पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडून तिघांची चौकशी सुरू आहे.

विशाल अगरवालनं ( Vishal Agarwal ) घटकांबळेच्या माध्यमातून डॉ. तावरे याच्याशी संपर्क साधत मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. तावरेने रक्त बदलण्याचा सल्ला विशाल अगरवाल यांना दिला. रक्त बदलल्यानंतर मद्यप्रशासन केल्याचा अहवाल येणार नाही. त्याचा पुढे केसमध्ये फायदा होईल, असं तावरेने विशाल अगरवालला सांगितलं होतं.

त्यानंतर अल्पवयीनं आरोपीचे रक्त घेतले. पण, दुसऱ्याचं व्यक्तीचे रक्त अल्पवयीन मुलाच्या नावानं दिलं. विशाल अगरवाल आणि डॉ. तावरेमध्ये आर्थिक देवाण-घेवाणसंदर्भात बोलणे झाल्यानंतर हाळनोर याला रक्त बदल आणि पुढील प्रक्रिया पार पाडण्यास तावरेने सांगितलं.

अल्पवयीनं मुलाच्या नावानं दिलेलं रक्त कुणाचं हे अद्याप समोर आलं नाही. त्यासह हाळनोर याला तीन लाख रूपये देण्यात आले होते. हाळनोर आणि शिपाई घटकांबळेकडून ते जप्त करण्यात आले आहेत. पण, हे पैसे कुणामार्फत दिले, हे स्पष्ट झालं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT