Vishal Agarwal News : विशाल अगरवाल यांनी जेवण मागितलं अन् तासाभरात बेड्या पडल्या; सिनेमास्टाइल घडली घटना...

Vedant Agarwal News : 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणात वेदांत अगरवालला जामीन झाल्यानंतर पोलिसांनी टीकेची झोड उठली होती. अखेर पोलिसांनी विशाल पाटलांना अटक करण्याचं ठरवलं. पण...
Vishal Agarwal
Vishal Agarwalsarkarnama

Pune Hit And Run Case, 22 May : पुण्यात मध्यरात्री अडीचच्या सुमारास आलिशान पोर्श कारनं दोन अभियंत्यांना चिरडून जीवे ठार मारलं. यातील अल्पवयीन मुलाचे वडिल बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल ( वय, 50 ) हे संभाजीनगरमध्ये येऊन लपले होते. पण, पुणे पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अगरवाल यांचा छडा लावला.

अल्पवयीन वेदांत अगरवाल ( Vedant Agarwal ) याचा तत्काळ जामीन झाल्यानं पोलिसांवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली. त्यानंतर गुन्ह्यात आवश्यक त्या कलमांत वाढ करून विशाल अगरवाल ( Vishal Agarwal ) यांना अटक करण्याच पोलिसांनी ठरवलं. मात्र, अटकेची चाहूल लागताच विशाल अगरवाल यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने धूम ठोकली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशाल अगरवाल आलिशान कारनं चालक चत्रभूज डोळस आणि राकेश पौडवाल यांच्यासोबत पळ काढला. रात्री एक ते सव्वाच्या सुमारास ते नगरमार्गे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. चालक डोळ याने अग्रवाल यांना रेल्वे स्थानक रस्त्यावरील जीएस प्लाझा या साधारण हॉटेलजवळ सोडले. यानंतर चालक डोळस नारळीबाग येथील जेपी इंटरनॅशन हॉटेलकडे निघून गेला.

गुन्हे शाखेचं पथक अगरवाल यांच्या मागावरच होते. 'जीपीएस'च्या माध्यमातून त्यांचा माग सुरू होता. अगरवाल हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी रिसेपनशकडे रूमची मागणी केली. त्यांनी तोंडाला रूमाल बांधला होता. उच्च न्यायालयात वकिलाकडे सकाळी काम आहे. भेटून लगेच जाणार, असं कारण सांगत त्यांनी हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंद केली. तेव्हा, त्यांनी कुठे जेवण भेटेल का? अशी विचारणा सुद्धा केली. दीड वाजले होते. हॉटेलचालकानं अगरवाल यांना पहिल्या मजल्यावर रूम दिली.

Vishal Agarwal
Porsche Hit And Run Case : आजोबांची 'गॅरंटी' अन् आरोपी वेदांतला न्यायालयानं हलक्यात सोडलं

त्यानंतर दीड तासात गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ पथकासह हॉटेलमध्ये दाखल झाले. त्याआधी वाघ यांनी चालक डोळस याला ताब्यात घेतलं होतं. डोळसनेच अगरवाल यांना हॉटेलमध्ये सोडल्याची माहिती दिली. पथकानं अगरवाल, डोळस आणि पौडवाल यांना ताब्यात घेत गुन्हे शाखा गाठली. नंतर पुणे शाखेनं तिघांना कारसह ताब्यात घेतलं.

डोंट वरी, कारवाईला तयार...

हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर प्रवीण वाघ यांनी आपली ओळख करून देत अगरवाल यांना ताब्यात घेणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी अगरवाल यांनी 'डोंट वरी... आपण कायदेशीर कारवाईला तयार आहे,' असं म्हटलं. यानंतर पोलिसांनी विशाल अगरवाल यांना ताब्यात घेत पुणे पोलिसांना माहिती दिली.

Vishal Agarwal
Pune Porsche Accident News : दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलानं दोन तासात पबमध्ये उडवली 'एवढी' रक्कम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com