Pune Porsche Crash News, 21 May : कल्याणीनगर भागात भरघाव मोटार चालवून दोघांना बळी घेणाऱ्या आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्याशिवाय मुलगा अल्पवयीन असूनही धनाढ्य बांधकाम व्यावसायिक वडिलांनी बेजबाबदारपणे त्याला गाडी चालविण्यास दिली.
त्यामुळे पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बांधकाम व्यावसायिक फरार झाले होते. आता पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे.
रविवारी ( ता. 19 ) पहाटे अडीचच्या सुमारास कल्याणीनगर-एअरपोर्ट रस्त्यावरील लँडमार्क सोसायटीजवळ भरघाव राखाडी रंगाची आलिशान पोर्श मोटारीनं दुचाकीला धडक दिली. त्यात अभियंते अनिष अवधिया ( वय 24, रा. पाली, मध्य प्रदेश ), आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा ( वय 24, रा. जबलपूर, मध्य प्रदेश ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध ( वय 17 ) गुन्हा दाखल झाला. त्याला रविवारी जामीन दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पण, अल्पवयीन आरोपीनं वाहन चालविण्यानं प्रशिक्षण घेतलेलं नाही. त्याच्याकडे वाहन परवानाही नाही. असे असताना वडील बांधकाम व्यावसायिकाने अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास दिली.
हे कृत्य बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75, 77 प्रमाणे आणि मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 3, 5, 199 ( अ ) नुसार वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर बांधकाम व्यावसायिक फरार झाले होते. आता पुणे पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे.
हॉटेलमालक आणि बार व्यवस्थापकावर गुन्हे दाखल
अल्पवयीन आरोपी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानिमत्त पार्टी करण्यासाठी शनिवारी ( ता. 18 ) रात्री साडेनऊच्या सुमारास दहा-बारा मित्रांसमवेत मुंढव्यातील एसीबी रस्त्यावरील कोढी हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला. त्यांनी मद्य आणि खाद्यपदार्थ ऑर्डर केले होते.
कोझी हॉटेलचे मालक आणि बार काउंटर व्यवस्थापक यांनी अल्पवयीन आरोप मुलासह त्याच्या मित्रांना मद्य दिले. त्यानंतर मुंढव्यातील हॉटेल ब्लॅकमध्ये सुद्धा गेले होते. त्यामुळे अल्पवयीन असूनही खात्री न करता त्यांना मद्य पुरवले. त्यावरून पोलिसांनी दोन्ही हॉटेल मालकांसह बार काउंटवर व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.