Ravindra Dhangekar : 'कल्याणीनगर केसमध्ये कोट्यवधींचा व्यवहार; आरोपीला रेड कार्पेट टाकून घरी पाठवलं'

Pune Drunk Hit And Run Case : पुण्यातील ड्रंक अॅन्ड हिट प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोपाने खळबळ
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Pune Crime News : कल्याणीनगर परिसरामध्ये शनिवारी बिल्डर व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे गाडी चालवत दोघांना चिरडल्याची घटना घडली. यानंतर अल्पवयीन आरोपीला तात्काळ जामीन मंजूर झाल्याने पोलिस कुठेतरी आरोपीबाबत सहानभूती दाखवत असल्याचा आरोप होत आहे.

त्यातच कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणांमध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला. यातूनच आरोपीला रेड कार्पेट टाकून पोलिसांनी घर पाठवले आहे, अशी टीकाही धंगेकरांनी केली आहे. Pune Drunk And Hit Case

या प्रकरणांमध्ये पोलिस आरोपीला पाठीशी घातला जात असल्याचा आरोप करत आज काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांनी येरावडा येथील पोलीस चौकीसमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी नोटांच्या गड्ड्या दाखवत पोलिस प्रशासनाच्या कारभारावर टीका केली.

धंगेकर म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणीनगर मधील सुरू असलेली पब संस्कृती बंद करण्याबाबत पोलिसांना अनेक निवेदन दिली आहेत. या पबमुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून त्यांनी देखील वारंवार पोलिस आयुक्तांना तक्रारी केल्या आहेत. मात्र पोलिसांच्या अभयांमुळेच या भागामध्ये पब खुलेआम रात्रभर सुरू असतात, याकडे धंगेकरांनी लक्ष वेधले.

Ravindra Dhangekar
Aaditya Thackeray On ECI : इच्छा असूनही आम्ही काही करू शकत नाही; आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

एका बिल्डरच्या मुलाने रविवारी दोन निष्पाप बळी घेतल्यानंतर देखील त्याला 151 आणि 304 अ हे कलम लागू करण्यात आली नाही. त्याला लाल कार्पेट टाकून घरी पाठवण्यात आले आहे. या केसमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. त्यामुळे या ठिकाणचे पोलिस हे पैसे खाण्यासाठी सोकवलेले असल्याची टीका करत यातूनच गोरगरिबांचा जीव जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निष्पाप तरुणांचे जीव गेले असताना पोलिस रेड कार्पेट टाकून आरोपींना घरी पाठवणार असतील तर तपास अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी धंगेकरांनी लावून धरली. धगेकरांनी या प्रकरणात उडी घेतल्याने पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ravindra Dhangekar
Maharashtra Politics : अमित शहांच्या मर्जीतील भाजप नेत्याचे मोठे भाकित; ‘विधानसभेला कदाचित वेगळं चित्र असूही शकतं’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com